आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

'फेसबुक'वर येणार्‍या पोस्टला कंटाळून तरुणीची आत्महत्या

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

जालंधर- सोशल नेटवर्कींग साइट 'फेसबुक'च्या माध्यमातून दोन तरुणांकडून वारंवार करण्यात येणार्‍या आक्षेपार्ह पोस्टला कंटाळून जालंधर येथील एका तरुणीने आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. रक्षा शर्मा (वय-20) असे या तरुणीचे नाव असून तिने होस्टलवर गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. रक्षाने आत्महत्या करण्यापूर्वी सुसाइड नोटही लिहून ठेवली होती. त्यात तिने दोन तरुणांना जबाबदार ठरवले आहे. लवप्रीत आणि दीपक सैनी असे या दोघांची नावे असून त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
पोलिस सूत्रांनुसार, 'फेसबुक'च्या माध्यमातून लवप्रीत आणि दीपक रक्षाला आक्षेपार्ह पोस्ट पाठवत असल्याचा उल्लेख या सुसाइड नोटमध्ये आहे.
पोलिसांनी दोघांचे कॉम्प्युटरही जप्त केले आहेत. लवप्रीत आणि रक्षा मित्र होते, अशी माहितीही चौकशीत समोर आली आहे. त्यामुळे रक्षा आणि लवप्रीतच्या 'फेसबुक' खाताची चौकशी करण्यात येणार असल्याचे पोलिसांनी सांगितले.
1997मध्ये जम्मू-कश्मीरमधील डोडा जिल्ह्यात 1997मध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यात रक्षाच्या आई-वडीलांचा मृत्यू झाला होता. त्यानंतर ती आपल्या भाऊ-बहिणीसोबत जम्मू येथील एका अनाथालयात राहत होती. जालंधर येथील 'मेहर चंद पोलिटेक्निक महाविद्यालयात शिक्षण घेत होती.
तीन मुलींसह आईचीही आत्महत्या, सासरच्या जाचाला कंटाळून कृत्य
सासरच्या छळास कंटाळून जावयाची आत्महत्या
हवाई सुंदरीची आत्महत्या, हरियाणाच्या गृह राज्यमंत्र्याचा राजीनामा