आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जनतेला महागाईचा तिहेरी दणका; डिझेल खिसा कापणार, कांदा रडवणार

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्‍ली- सर्वसामान्‍य जनतेला महागाईचा तिहेरी दणका बसणार आहे. सर्वप्रथम डिझेलच्या दरवाढीबाबतचा संभ्रम दुर करताना, दरमहा 40 ते 50 पैशांनी डिझेलची दरवाढ होणार असल्‍याचे सरकारने स्‍पष्‍ट केले. तसेच कांदाही जनतेला रडवणार असल्‍याची चिन्‍हे आहेत. चालू आठवड्यात कांद्याचे दर दुपटीने वाढले आहेत. त्‍यात आणखी वाढ होण्‍याची शक्‍यता आहे. तर वीजदरही वाढण्‍याची शक्‍यता आहे. त्‍यामुळे येणारा अर्थसंकल्‍प जनतेला काही दिलासा घेऊन येणारा हवा, अशी अपेक्षा व्‍यक्त करण्‍यात येत आहे.

पेट्रोलियम मंत्री वीरप्‍पा मोईली यांनी डिझेल दरवाढीबाबत सविस्‍तर माहिती देताना सांगितले की, तेल कंपन्‍यांना डिझेलच्‍या विक्रीतून नुकसान होत आहे. डिझेलची दरवाढ केल्‍यामुळे सबसिडीपोटी देण्‍यात येणारे 12 हजार 907 कोटी रुपये वाचतील.