आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Commonwealth Scam 71 Lacs Gave To Shilpa Shetty For Dance

राष्‍ट्रकूल घोटाळा: शिल्‍पा शेट्टीच्‍या नृत्‍यावर उडवले 71 लाख रूपये

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्‍ली- वर्ष 2008 मध्‍ये झालेल्‍या राष्‍ट्रकूल क्रीडास्‍पर्धेच्‍या समारोपाच्‍या कार्यक्रमात अभिनेत्री शिल्‍पा शेट्टीच्‍या नृत्‍यासाठी दोन प्रमोटरनी 71. 73 लाख रूपये खर्च केले होते. राष्‍ट्रकूल क्रीडा स्‍पर्धा आयोजन समितीचे बडतर्फ अध्‍यक्ष सुरेश कलमाडी यांच्‍या इच्‍छेखातर या नृत्‍याचे आयोजन करण्‍यात आले होते असे सांगितले जाते.

राष्‍ट्रकूल स्‍पर्धेतील घोटाळयाप्रकरणी कलमाडी यांच्‍यावर आरोप निश्चित करताना कोर्टाने फरीदाबाद येथील जेम इंटरनॅशनलचे प्रमोटर पी. डी आर्या आणि ए. के मदान यांनी शिल्‍पाला सादरीकरणासाठी व्हिज क्रॉफ्ट इंटरटेनमेंट फर्मला 71. 73 लाख रूपये दिले होते. आर्या आणि मदान यांनी हा पैसा त्‍यांच्‍या फर्मला मिळालेल्‍या कामाव्‍यतिरिक्‍त खर्च केले होते. जेम इंटरनॅशनल स्विस टायमिंगसाठी काम करत होती.त्‍यांना राष्‍ट्रकूलमध्‍ये क्रीडास्‍पर्धेमध्‍ये टायमिंग, स्‍कोअरिंग आणि रिझल्‍ट सिस्‍टीम लावण्‍याचे कंत्राट अवैधरित्‍या देण्‍यात आले होते.