आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

संगणकाच्या आदेशावरून चालतात त्यांची बोटे

10 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

रांची: झारखंडमधील दुमका येथे राहणारा बाबू मरांडी हा सहावीचा विद्यार्थी कॉम्प्युटरमधून येणा-या आवाजानुसार टायपिंग करतो. अशाच
प्रकारे परमेश्वर कुमार आणि इतर 12 विद्यार्थ्यांची बोटेही की-बोर्डवर संगणकाच्या आज्ञेनुसार भराभर चालतात. हे सर्वजण अंध असून, एका विशेष सॉफ्टवेअरच्या मदतीने संगणकावर टायपिंग करायला शिकले आहेत.
हरमू येथील राजकीय नेत्रहीन विद्यालयाने या अंध विद्यार्थ्यांना संगणक प्रशिक्षण देण्यास सुरुवात केली असून, हे विद्यार्थी अत्यंत एकाग्रतेने संगणकीय कौशल्ये आत्मसात करीत आहेत. सुपरनोव्हा स्क्रीन रीडिंग नावाचे एक
विशेष सॉफ्टवेअर या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करते.
14 विद्यार्थ्यांना प्रशिक्षण : 14 नेत्रहीन विद्यार्थ्यांना टायपिंगसह एमएस आॅफिस, एक्सेल, पॉवर पॉइंट, इंटरनेट एक्स्प्लोरर आणि की बोर्ड ओरिएंटेशन शिकवले जात आहे. हे प्रशिक्षण त्यांना दोन वर्षे दिले जाणार आहे.
केंद्राच्या सहकार्याने प्रशिक्षण: हा कोर्स राज्य अपंग आयोग आणि केंद्रीय माहिती व तंत्रज्ञान विभागाच्या सहकार्याने सुरू आहे. अंध विद्यार्थ्यांना संगणक शिकवण्यासाठी नॅशनल असोसिएशन आॅफ ब्लाइंड, इंटरनेट आयसीटी लॅब यांनी तंत्रसाहाय्य केले असून, या विद्यार्थ्यांसाठी आॅडिओ सॉफ्टवेअरही तयार केले आहे.
अत्यंत हुशार विद्यार्थी
हे विद्यार्थी इतर विद्यार्थ्यांप्रमाणेच परिश्रम करतात आणि लक्षपूर्वक संगणक शिकतात. ते अत्यंत हुशार असून, त्यांना शिकवणे खूप सोपे आहे. त्यांना शिकवलेली गोष्ट ते लगेच लक्षात ठेवतात.
मनीष तिवारी, संगणक प्रशिक्षक