आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Computer Virus Of Dns Changer Attack On Internet

'डीएनएस चेंजर' व्हायरसची हवा गुल; इंटरनेट सेवेवर परिणाम नाही

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली: गेल्या वर्षभरापासून जगभरातील इंटरनेट वापरकर्त्यांच्या कॉम्प्युटर्समध्ये घर करून बसलेला 'डीएनएस चेंजर' नामक व्हायरसचा हवा गुल झाली आहे. या व्हायरसमुळे जगभरातील लाखो कॉंम्प्युटर्सची इंटरनेट सेवा ठप्प होण्याची भीती व्यक्त केली जात होता. परंतु अमे‍रिकन तपास संस्था एफबीआयने केलेल्या रामबाण उपाययोजनामुळे जगातील इंटरनेट सेवेवर कोणताही परिणाम न झाल्याचे वृत्त आहे.
जगभरातील सुमारे 3.5 लाख पेक्षा जास्त कॉंम्प्युटर्सची इंटरनेट सेवा ठप्प होणार तसेच कॉम्प्युटर्सही निकामी होण्याची शक्यता वर्तवली जात होती. परंतु सुदैवाने तसे काही झाले नाही.
बनावट वेबसाईटसाठी काम करणारा 'डीएनएस चेंजर' हा व्हायरस एफबीआयने गेल्या वर्षी नोव्हेंबरमध्ये शोधून काढला होता. त्याला नष्ट करण्‍यासाठीएफबीआयने दोन चांगले सर्व्हर बसवून इंटरनेट फ्लो त्यावरून वळवला. मात्र, ही यंत्रणा आज, 9 जुलै रोजी बंद होणार होती. त्यामुळे डीएनएसने प्रभावित झालेल्या कॉम्प्युटर्सची इंटरनेट सेवा ठप्प होण्याची भीती व्यक्त केली जात होती.
या पद्धतीने तुम्ही तुमच्या कॉम्प्युटर्सचे संरक्षण करू शकता-
'डीएनएस चेंजर' हा भयंकर व्हायरस तुमच्या कॉम्प्युटरमध्ये आहे किंवा नाही, हे तुम्ही काही सेकंदात माहीत करू शकतात.
1. वेबसाईट www.dns-ok.us वर जा.
2. डीएनएसच्या मुख्यपानावर जाऊन I Agree वर क्लिक करा. त्यानंतर पुन्हा एक पान ओपन होईल. जर त्यात तुम्हाला हिरव्या रंगाचे बॅनर दिसेल. तर देव पावला. तुम्हाला चिंता करण्याचे कारण नाही.
3. हिरव्या रंगाचे बॅनर संकेत देते की तुमच्या कॉम्प्युटरमध्ये हा व्हायरस नाही.
4. जर तुमच्या स्क्रिनवर लाल रंगाचे बॅनर दिसत असेल तर तुमच्या कॉम्प्युटरमध्ये हा व्हायरस आहे. परंतु घाबरून जाऊ नका. त्याला तुम्ही सहज स्कॅन करून त्याला डिलेट करू शकता.
अन्य उपाय-
'डीएनएस चेंजर'ला डिलेट करण्‍यासाठी इंटरनेटवर अनेक उपाय आहेत. फ्री व्हायरस स्कॅन आणि रिमूव्हल सॉफ्टवेयर्ससाठी www.dcwg.org/fix वर जाऊन फ्री व्हायरस स्कॅन करू शकता. परंतु कॉम्प्युट स्कॅन करण्‍यापूर्वी तुमचा महत्त्वाचा डेटाचा बॅकअप घ्या.
फेसबुकचा मालक झुकेरबर्गही शिकार झाला व्हायरस हल्ल्याचा
इंटरनेट ब्राउजिंग करताना या गोष्टी लक्षात ठेवा
इंटरनेट सर्व्हर पडणार बंद, मालवेअरचा ‘राडा’!