आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
Install AppADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अॅप
नवी दिल्ली। बाबा रामदेव यांच्या प्रस्तावित उपोषणावर काँग्रेसने टिप्पणी करताना म्हटले की, उष्णतेच्या दिवसांत त्यांनी कमी खाण्याचे ठरवले आहे. हे चांगलेच आहे. पण त्यांनी पाणी मात्र जास्त प्यावे, अशा शब्दांत काँग्रेसने रामदेव बाबा यांना खोचक सल्ला दिला.
आर्थिक मुद्दय़ांवर बोलण्यास रामदेव बाबा हे योग्य व्यक्ती नाहीत. त्यांच्यासारखे लोक वाट्टेल ते वक्तव्य करून देशाची आर्थिक स्थिती खराब करू लागले आहेत. त्यांच्यामुळे देशातील गुंतवणुकीचे वातावरण बिघडून जाईल. गुंतवणूकदारांचा विश्वास कमी होईल, असे काँग्रेस प्रवक्त्याने म्हटले आहे.
सरकारमधील मंत्र्यांवर करण्यात आलेले आरोपही काँग्रेसकडून फेटाळून लावण्यात आले. टीम अण्णाकडून हे आरोप लावण्यात आले होते. दुसरीकडे आता आपल्याला पंतप्रधानांवर विश्वास राहिला नाही, असे रामदेव बाबांनी म्हटले आहे.
पंतप्रधान अप्रामाणिक, आयपीएलमध्ये दाऊदचा पैसाः रामदेव बाबांचा हल्लाबोल
अण्णा, रामदेव बाबांच्या सर्मथनार्थ रविवारी धरणे
जे मौलाना करू शकत नाही ते करणार रामदेव बाबा
Copyright © 2020-21 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.