आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Congress Directionless And Rahul Gandi Workless, Comment By Salman Khurshid

राहुल गांधी निष्क्रिय तर पक्ष दिशाहीन; सलमान खुर्शीदांकडून कॉंग्रेसला घरचा आहेर

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्‍ली- कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि केंद्रीय कायदा मंत्री सलमान खुर्शीद यांनी पक्षाला घरचा आहेर दिल्यानंतर पदाधिकारी खळबडून जागे झाले आहेत. कॉंग्रेसविरोधी वक्तव्य करणार्‍या खुर्शींदांकडून स्पष्टीकरण मागितल्यानंतर खुर्शीद यांनी 'यू टर्न' घेतला आहे.
खूर्शीद म्हणाले, माझ्या वक्तव्याचा चुकीचा अर्थ घेण्यात आला आहे. राहुल गांधी यांनी आता नेतृत्त्व करण्याची आवशक्यता आहे, या अर्थाने मी असे वक्तव्य केले होते. परंतु त्याचा नकारात्मक अर्थ घेण्यात आला. पक्ष दिशाहीन झाल्याचे वक्तव्य मी कधीही केलेले नाही.
यापूर्वी खूर्शीद यांनी कॉंग्रेस दिशाहीन झाला असून, कॉंग्रेसचे युवराज राहुल गांधी निष्क्रिय असल्याचा टोला खुर्शीद यांनी लगावला होता.
खुर्शीद म्हणाले की, कॉंग्रेसमध्ये राहुल गांधीसारखे युवा नेता असतानाही त्यांच्याकडून पक्षासाठी कोणतीही वैचारिक दिशा मिळत नाही. पक्षातील ही सगळ्यात मोठी समस्या आहे. राहुल यांना केवळ निवडणुकीच्या काळातच 'आयडिया' सुचतात. त्यानंतर मात्र ते शांत बसतात. त्यामुळे पक्षातील बाकी नेत्यांकडे हातावर हात धरून बसण्याशिवाय दुसरा मार्ग नसतो.
यूपीएमध्ये राजकारणी आणि अधिकारी यांच्यात संगनमत तयार झाले आहे. ते पक्षासाठी धोकादायक असल्याचे खुर्शीद यांनी सांगितले. कॉंग्रेस अध्‍यक्षा सोनिया गांधी याच यातून मार्ग काढू शकतात, असेही त्यांनी म्हटले होत.
राहुल गांधींनी बलात्‍काराचे आरोप फेटाळलेः सर्वोच्‍च न्‍यायालयात शपथपत्र सादर
सोनिया गांधी पंतप्रधान झाल्या असत्या तर, पवारांनी मंत्रिपद स्वीकारले नसते
राहुल गांधींना पडला 'वॅरोनिका'चा विसर, अफगाणची राजकुमारी नवी गर्लफ्रेंड?