आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

काँग्रेसकडून गटबाजी रोखण्यासाठी गुप्त कोडची मदत

10 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

अमेठी - कॉँग्रेसच्या नेत्यांनी पक्षहितासाठी अंतर्गत मतभेद दूर ठेवावेत, असे आवाहन प्रियंका गांधी-वडेरा यांनी पक्ष कार्यकर्त्यांना केले. एका गुप्त कोडच्या आधारे ग्रामीण भागामध्ये भरारी पथकाच्या माध्यमातून गटबाजीवर लक्ष ठेवले जाईल. तिलोई मतदारसंघातील कार्यकर्त्यांशी बोलताना त्यांनी ही माहिती दिल्याचे पक्षसूत्रांनी सांगितले.
याबरोबरच गटबाजी करणाºयांची गय केली जाणार नाही, असा इशाराही त्यांनी दिला. प्रियंका गांधी सध्या अमेठी आणि रायबरेलीच्या दौºयावर असून यामध्ये त्यांनी नेते, कार्यकर्त्यांशी संवाद साधला. मिशन 2012 उद्दिष्ट प्राप्त करण्यासाठी नेते-कार्यकर्त्यांनी आपसातील मतभेद दूर ठेवावेत, असे आवाहन गांधी यांनी केले. कॉँग्रेस आणि यूपीए सरकारने केलेल्या लोकोपयोगी कार्यकर्त्यांची माहिती देऊन पक्षासाठी जनाधार वाढवावा, अशी सूचना त्यांनी केली. कॉँग्रेसच्या कार्यपद्धतीबाबत बोलताना त्या म्हणाल्या की, पक्षाचे कार्यकर्ते संघटनेचा कणा असून त्यांचा आदर राखला पाहिजे. असे असले तरी नेते, कार्यकर्त्यांनी गटबाजीमध्ये वेळ न घालता कॉँग्रेस सरचिटणीस राहुल गांधी यांना बळ द्यावे, असे आवाहन प्रियंका गांधी यांनी केले. विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आपण अमेठी आणि रायबरेली मतदारसंघांचा प्रचार 2 फेब्रुवारीपासून सुरू करू, असे आश्वासन त्यांनी दिले.
अमेठी हा भाऊ राहुल गांधी यांचा, तर रायबरेली हा आई सोनिया गांधी यांचा मतदारसंघ आहे. राहुल आणि सोनिया गांधी पाच राज्यांच्या निवडणुकीमध्ये व्यग्र असल्याने प्रियंका गांधी उत्तर प्रदेशातील रणनीतीवर लक्ष ठेवणार असल्याचे पक्षसूत्रांनी सांगितले.
ताफा अडवल्या - तिलोई मतदारसंघातील उमेदवार मुस्लिम कार्यकर्त्यांकडे लक्ष देत नसल्याचा आरोप करण्यात येत आहे. या पार्श्वभूमीवर उमेदवाराने सर्वांना बरोबर घेऊन काम करणे आवश्यक आहे आणि संबंधित मतदारसंघावर पक्ष लक्ष ठेवून असेल, असे प्रियंका म्हणाल्याचे सूत्रांनी सांगितले. त्याआधी बाबूगंजमध्ये त्यांच्या वाहनांचा ताफा अडवून स्वच्छ प्रतिमेचा उमेदवार देण्याची मागणी त्यांनी केली. अमेठी आणि रायबरेली लोकसभा मतदारसंघातील 10 पैकी सहा विधानसभा मतदारसंघ काँग्रेसच्या ताब्यात आहेत. उत्तर प्रदेश विधानसभा निवडणूक सात टप्प्यांत होणार असून पहिला टप्पा 8 फेब्रुवारीपासून सुरू होणार असून शेवटचा 3 मार्च रोजी संपणार आहे.