आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

राहुल गांधी काँग्रेसचे उपाध्यक्ष; काँग्रेस नेत्यांसह देशभरातील कार्यकर्त्यांकडून स्वागत

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जयपूर- काँग्रेसचे युवराज व सरचिटणीस राहुल गांधी यांना काँग्रेस पक्षाचे उपाध्यक्षपद देण्यात आल्याची घोषणा पक्षाचे प्रवक्ते जनार्धन त्रिवेदी यांनी केली. याचबरोबर राहुल गांधी पक्षात नंबर दोनचे नेते असतील, असेही त्यांनी जाहीर केले. याचबरोबर जयपूरपासून ते दिल्लीपर्यंत सर्वत्र या घोषणेचे जल्लोषात स्वागत करण्यात आले. देशभरही काँग्रेस कार्यकर्त्यांनी फटाके वाजवून जल्लोष साजरा करण्यात आला. राहुल यांच्या निवडीचे काँग्रेस पक्षातील युवा दमाच्या नेत्यांनी जोरदार स्वागत केले आहे.
जयपूरमध्ये काँग्रेस पक्षाचे तीन दिवसीय चिंतन शिबिर सुरु असून, रविवारी शिबिराचा समारोप होत आहे. दरम्यान, आज दिवसभरापासूनच राहुल गांधी यांना काँग्रेस पक्षात मोठी जबाबदारी देण्यात येणार असल्याच्या बातम्या येत होत्या. अखेर जयपूरमध्ये शनिवारी रात्री आठच्या सुमारास काँग्रेस कार्यसमितीची बैठक संपली. बैठकीत संरक्षणमंत्री ए. के. एंटनी यांनी राहुल गांधी यांना पक्षाचे उपाध्यक्ष बनविण्यात यावे असा प्रस्ताव मांडला. त्याला पक्षातील नेत्यांनी एकमताने मंजुरी दिली. तसेच राहुल गांधी यांनीही आपण पक्षाचे उपाध्यक्षपद स्वीकारण्यास तयार असल्याचे सांगितले अशी माहिती त्रिवेदी यांनी पत्रकार परिषदेत दिली. राहुल गांधी आता काँग्रेस पक्षात सोनिया गांधी याच्यानंतरचे सर्वांत पॉवरफूल नेते असतील. तसेच आता पक्षाचे क्रमांक दोनचे नेते असतील. राहुल यांना काँग्रेस पक्षाचे कार्यकारी अध्यक्षपद अथवा उपाध्यक्षपद देण्याची शक्यता दिवसभर वर्तविण्यात येत होती. अखेर त्यांना उपाध्यक्षपदाची जबाबदारी देण्यात आली.
दरम्यान, प्रमुख विरोधी पक्ष भारतीय जनता पक्षाने काँग्रेस पक्षाच्या निर्णयाची खिल्ली उडविली आहे. राहुल गांधी यापूर्वीच पक्षात नंबर दोनचे नेते होते. त्यामुळे त्यांना उपाध्यक्षपद दिले यात नविन काहीच नाही. पक्षाचे प्रवक्ते शहनवाज हुसैन यांनी याबाबतची प्रतिक्रिया दिली.

राहुल यांच्याबाबत कोण काय म्हणाले वाचण्यासाठी पुढे क्लिक करा....