आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करानवी दिल्ली- चिंतन शिबिरात दहशतवादाचा मुद्दा मोठा ठरवणारे काँग्रेस नेते त्याच मुद्द्यावर उलटसुलट वक्तव्ये करत सुटले आहेत. गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांच्या वक्तव्याची संसदीय कामकाजमंत्री कमलनाथ यांनी पाठराखण केली आहे. पक्ष शिंदे यांच्या वक्तव्याच्या पाठीशी असल्याचे त्यांनी सोमवारी स्पष्ट केले.
एकीकडे अशी राळ उठली असतानाच पक्षाचे सरचिटणीस दिग्विजयसिंह यांनी दहशतवादी हाफिज सईदचा ‘साहेब’ अशा आदरार्थी शब्दांत उल्लेख केला. ‘गेल्या 11 वर्षांपासून मी जे सांगत आलो त्यावर गृहमंत्र्यांनी शिक्कामोर्तब केले आहे. हाफिज सईद साहेबांबाबत बोलायचे झाले तर... त्यांचा दहशतवादी कारवायांत हात आहे हे स्पष्टच आहे...’, असे दिग्विजय म्हणाले. मुंबई हल्ल्याचा मास्टरमाइंड हाफिज सईदने ट्विट केले आहे की, ‘दहशतवादाचे मूळ भारतच आहे हे आता स्पष्ट झाले असून, त्यांचे गृहमंत्रीच हे बोलत आहेत. भारताचा बुरखा फाडण्यासाठी पाक सरकारने हे प्रकरण संयुक्त राष्ट्रांच्या सुरक्षा परिषदेत उपस्थित करावे.’
‘काँग्रेस नेत्यांनी माफी मागितली नाही तर 24 जानेवारीपासून देशभर तीव्र निदर्शने करण्यात येतील,’ असा इशारा भाजप प्रवक्ते शाहनवाज हुसेन यांनी दिला. त्यावर आमच्याकडे पूर्ण पुरावे आहेत. मग माफी कशासाठी, असा सवाल दिग्गींनी केला आहे.
पूर्वीही केला होता दहशतवादाचा सन्मान
चिदंबरम यांनी भगवा दहशतवाद सरकारी फाइलमध्ये आणला
25 ऑगस्ट 2010 रोजी तत्कालीन गृहमंत्री पी. चिदंबरम यांनी पोलिस प्रमुखांच्या बैठकीत म्हटले होते की, ‘भगवा दहशतवाद’ हे पोलिसांसमोर नवे आव्हान म्हणून समोर येत आहे.
दिग्विजयसिंह यांचे ओसामा‘जी’
*दिग्विजयसिंह यांनीही 7 मे रोजी जगातील सर्वात मोठा अतिरेकी लादेनला सन्मानाने ‘ओसामाजी’ संबोधण्याचा पराक्रम केला होता.
शिंदेंचे ‘श्रीमान’ हाफिज
*गृहमंत्री शिंदे यांनी 17 डिसेंबर 2012 रोजी संसदेत हाफिजला ‘श्रीमान हाफिज’ असे संबोधले होते.
भाजपने दिली काँग्रेसच्या व्होट बँक राजकारणाची 4 उदाहरणे
1. सर्वोच्च् न्यायालयाने फाशीची शिक्षा ठोठावल्यानंतरही संसद हल्ल्याचा आरोपी अफजल गुरूची याचिका प्रलंबित ठेवणे.
2. सर्वोच्च् न्यायालयाने मंजुरीची मोहोर उमटवल्यानंतरही ‘पोटा’ हा दहशतवादविरोधी कायदा संयुक्त पुरोगामी आघाडी (यूपीए) सरकारकडून रद्दबातल केला जाणे.
3. भारतात अवैधपणे राहणा-या बांगलादेशी नागरिकांना
परत मायदेशी पाठवण्यासाठी कडक कारवाई करण्याऐवजी त्यांना उलट संरक्षण दिले जाणे.
4. बाटला हाऊस चकमकीतील शहीद उत्तराखंडचा जवान मोहनचंद शर्माच्या कुटुंबीयांचे सांत्वन करण्याऐवजी काँग्रेस नेत्यांच्या वेळोवेळी आझमगडमधील अतिरेक्यांच्या घरचा पाहुणचार झोडणे.बाटला एन्काउंटरमधील शहिदांच्या हौतात्म्यावर अश्रू ढाळण्याऐवजी मारल्या गेलेल्या दहशतवाद्यांचा पुळका येणे. ही बाब खुद्द कायदामंत्री सलमान खुर्शीद आणि दिग्विजयसिंह यांनी उत्तर प्रदेश निवडणुकीदरम्यान प्रसारमाध्यमांसमोर विशद केली होती.
- भाजप प्रवक्ते रविशंकर प्रसाद यांचे आरोप
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.