आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करागांधीनगर- गुजरात विधानसभा अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी शेतकरी कॉंग्रेस संघटनेने काढलेल्या रॅलीने प्रतिबंधित क्षेत्रात प्रवेश केल्यामुळे पोलिसांना रॅलीवर लाठीमार आणि अश्रू धुराचा वापर करावा लागला. सध्या परिस्थिती नियंत्रणात असून काही कॉंग्रेस कार्यकर्त्यांना व नेत्यांना ताब्यात घेतले आहे.
याबाबत सविस्तर वृत्त असे की, शेतकरी कॉंग्रेस संघटनेने गुरूवारी रॅली काढली होती. यावेळी रॅलीने प्रतिबंधीत क्षेत्रात प्रवेश केला. पोलिसांनी त्यांना अडवले परंतु, कार्यकर्त्यांनी त्यांना न जुमानता आत प्रवेश केल्यामुळे लाठीमार सुरू केला. काही क्षणातच परिस्थिती नियंत्रणाबाहेर गेल्यामुळे पोलिसांनी रॅलीवर अश्रूधुराचा वापर केला.
गुजरात दंगल: मोदी सरकारला न्यायालयाचा झटका
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.