आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

खासदार दर्डा यांना काँग्रेसने फटकारले

10 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली - मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांना ‘गुजरात का शेर’ असे संबोधणा-या खासदार विजय दर्डा यांच्या वक्तव्यावर असहमती दर्शवतानाच काँग्रेसने त्यांना कडक शब्दांत फटकारले आहे. धार्मिक कार्यक्रमात राजकीय वक्तव्य करणे चुकीचे आहे. कोणीही तसे करू नये, असे पक्षाचे गुजरात प्रभारी मोहन प्रकाश यांनी म्हटले आहे.
या प्रकरणाबाबत बुधवारी पत्रकारांशी बोलताना मोहन प्रकाश म्हणाले की, धार्मिक कार्यक्रमात राजकारण कदापिही आणले जाऊ नये. मी बाहेर असल्यामुळे दर्डा यांची भेट होऊ शकली नसल्याचे त्यांनी एका प्रश्नाच्या उत्तरात सांगितले.
विजय दर्डा हे काँग्रेसचे महाराष्ट्रातील राज्यसभा खासदार आहेत. रविवारी अहमदाबाद येथे तरुण क्रांती पुरस्कार वितरण समारंभात त्यांनी मोदी यांची तोंडभरून स्तुती केली होती. ‘गुजरात का शेर’ आणि ‘राष्ट्रसंत’ अशा शब्दांत दर्डा यांनी मोदींचे गुणगान केले होते. नंतर मात्र घूमजाव करत आपण मोदी यांची स्तुती केलीच नसल्याचा पवित्रा दर्डा यांनी घेतला होता. त्यांच्या वक्तव्यावरून प्रचंड वादंग उठले आणि काँग्रेसने या प्रकरणी राज्याचे प्रभारी मोहन प्रकाश यांच्याकडे अहवाल मागितला आहे. प्रकाश हे महाराष्ट्राचेही प्रभारी आहेत. त्यामुळे त्यांच्या वरील प्रतिक्रियेला वेगळे महत्त्व आहे.