आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बजेटमध्‍ये कॉँग्रेसी प्रतिबिंब उमटणार

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंकनवी दिल्ली - 2014 ची लोकसभा निवडणूक तोंडावर आल्याने अर्थमंत्री पी. चिदंबरम यांना कॉँग्रेस नेते आपल्या अपेक्षांची यादी सादर करणार आहेत. चिदंबरम नेत्यांचे म्हणणे ऐकून घेण्यासाठी 14 रोजी पक्ष कार्यालयात जाणार आहेत. कॉँग्रेस नेते या वेळी प्राप्तीकराच्या सवलतीच्या मर्यादेत वाढ व दारिद्र्यरेषेखालील व्यक्तींच्या योजनांसाठी जास्त निधी देण्याची मागणी करतील, अशी अपेक्षा आहे.

कॉँग्रेससमोरील आव्हान
उपाध्यक्षपद स्वीकारल्यानंतर राहुल यांनी काँग्रेस कार्यकारिणीची तीन वेळा बैठक घेतली आहे. राहुल यांना संघटनेत ऊर्जा निर्माण करण्यासाठी पावले उचलावी लागतील. कॉँग्रेस सध्या डझनभर राज्यांत सत्तेत आहे. आंध्र प्रदेशात त्यांनी स्वबळावर सत्ता स्थापन केली आहे. स्वतंत्र तेलंगणाचा मुद्दा व वायएसआर कॉँग्रेसचा उदय कॉँग्रेससाठी डोकेदुखी ठरली आहे. उत्तर प्रदेश, बिहार, गुजरात, मध्य प्रदेश, प. बंगाल व तामिळनाडूमध्ये कॉँग्रेसची अनेक वर्षांपासून सत्ता नाही.