आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Constable Arrested For Asking Call Details Of Arun Jaitley

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

हत्‍येपूर्वी पॉन्‍टी चढ्ढाच्‍या मोठ्या भावासोबत झाले होते अरुण जेटलींचे संभाषण

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्‍ली- भारतीय जनता पार्टीचे ज्‍येष्‍ठ नेते आणि राज्‍यसभेतील विरोधी पक्षनेते अरुण जेटली यांच्‍या फोन कॉल्सचा तपशिल मागण्‍याच्‍या प्रयत्‍नात एका पोलिस कॉन्‍स्‍टेबलला अटक करण्‍यात आली आहे. या प्रकरणामुळे राजकीय वर्तूळात खळबळ उडाली आहे.

अरुण जेटली यांचा कॉल तपशिल दिल्‍ली पोलिसांच्‍या चार कार्यालयांमधून मागविण्‍यात आला होता. प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन दिल्‍ली पोलिस मुख्‍यालयाने तपास हाती घेतला आहे. अधिक माहिती घेतली असता पॉन्‍टी चढ्ढा प्रकरणाशी या प्रकरणाचे संबंध समोर आले आहेत. चढ्ढा बंधुंच्‍या कॉल रेकॉर्डची तपासणी करताना अरुण जेटलींचा नंबर समोर आला. पॉन्‍टी चढ्ढाची हत्‍या होण्‍याच्‍या एक दिवस आधी अरुण जेटली आणि पॉन्‍टीचा मोठा भाऊ हरदीप यांच्‍यात संभाषण झाले, असे पोलिस सुत्रांचे म्‍हणणे आहे. वरिष्‍ठ पोलिस अधिका-यांना तपासामधील ही बाब माहिती आहे. त्‍या दिशेने तपास सुरुही आहे. परंतु, त्‍या क्रमांकाचा कॉल तपशिल मागविण्‍यात आलेला नाही, असे पोलिस अधिका-यांचे म्‍हणणे आहे.

अरविंद डबास असे या कॉन्‍स्‍टेबलचे नाव आहे. त्‍याने नवी दिल्‍लीतील सहायक पोलिस आयुक्तांचे ईमेल अकाऊंट हॅक केले आणि त्‍यामार्फत अरुण जेटलींच्‍या कॉल्‍सचा तपशिल एका टेलिकॉम कंपनीला मागितल होता. त्‍याने पाठविलेल्‍या ईमेलमध्‍ये अरुण जेटली यांचे नाव नव्‍हते. परंतु, ज्‍या मोबाईल क्रमांकाचा तपशिल मागितला तो क्रमांक अरुण जेटली यांचा आहे. टेलिकॉम कंपनीने यासंदर्भात संबंधित पोलिस अधिका-यांना फोन करुन विचारणा केली असता त्‍यांनी असा कोणताही तपशिल मागितलेला नसलचे सांगितले. त्‍यानंतर चौकशी करण्‍यात आली. तेव्‍हा डबास जाळ्यात अडकला. याप्रकरणी दिल्‍ली पोलिसांकडून आणखी दोन जणांचा शोध सुरु आहे.

अटक करण्‍यात आलेल्‍या कॉन्‍स्‍टेबलने वेगळीच कथा सांगितली. त्‍याचे काही पैसे अडकले आहेत. ते वसूल करण्‍यासाठी काही नेत्‍यांचे नंबर शोधून काही करता येते का, यासाठी तो प्रयत्‍नशील होता. परंतु, पोलिसांचा या कथेवर विश्‍वास नाही.