आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ममता बॅनर्जींची मनमानी सुरूच; न्यायालयाचा अवमान केल्याने अडचणीत!

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

कोलकाता- न्यायप्रक्रीयेविरुद्ध वक्तव्य करून पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी अडचणीत‍ सापडल्या आहे. न्यायालयाचा अवमान केल्याप्रकरणी ममतांविरुद्ध खटला चालवला जाण्याची शक्यता आहे
न्यायालयातील एक वर्ग भ्रष्ट आहे. काही खटल्यात पैशांच्या जोरावर न्यायालयातील निर्णयही बदलले जातात, असे खळबळजनक वक्तव्य ममतांनी मंगळवारी केले होते. ममतांनी न्यायालयाचा अवमान केला आहे. त्यांच्याविरोधात कारवाई झाली पाहिजे, अशी याचिका कोलकाता येथील वकील संघटनेने गुरुवारी दाखल केली आहे.
दरम्यान, स्वतःच्या मर्जीने वागणार्‍या ममता बॅनर्जी यांनी कोलकात्यात स्वातंत्र्यदिनाचा सोहळा साजरा करण्याची परंपरा पार बदलून टाकली. सालाबादाप्रमाणे मुख्यमंत्र्यांनी 'रॉयटर्स बिल्डिंग' येथे ध्वजारोहण करण्याची परंपरा पश्चिम बंगालमध्ये आहे. मात्र यंदा ममतांनी 'रेड रोड'वर ध्वजारोहण केले. विशेष म्हणजे रेड रोड येथे ममतांचे भाषण आणि एका विशेष परेडचे आयोजन करण्यात आले होते. या परेडमध्ये कोलकाता पोलिससह विविध शाळांचे विद्यार्थी सहभागी झाले होते.
ममता बॅनर्जींनी केले परंपरेचे उल्लंघन
ममता हॉस्पिटलवर तुफान दगडफेक
हुकूमशाह आहेत ममता बॅनर्जी- मार्कंडेय काटजू