आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सिनेमातील दोन-चार दृश्यांमुळे 2000 वर्षांच्या जुन्या धर्मांला नुकसान पोहचते का?

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

कमल हसनचा चित्रपट 'विश्‍वरूपम' सोबत जे काही झाले ते याआधी हिंदी चित्रपटांच्या बाबतीतही झाल्याचे दिसून येते. काही चित्रपट हे राजकारणाचे व जातीयवादाचे बळी ठरले आहेत. काही चित्रपटाच्या बाबतीत तर शुटिंग सुरु होण्याच्या आधीच वादात अडकल्याचे व वाद निर्माण केल्याची उदाहरणे दिसतील. त्यामुळे दुस-या देशात अशा चित्रपटाचे शुटिंग केल्याचे दिसून येते.

भारतात विशेषत हिंदी चित्रपटावर बंदी घालण्याची किंवा त्याला नुकसान पोहचवण्यात हिंदू संघटना आघाडीवर आहेत. तर काही वेळा मुस्लिम तर कही वेळा हिंदू धर्मातील विविध जाती-जमाती. कधी-कधी तर स्वत: सरकारनेच काही चित्रपटांची अडचण तयार केली आहे. दिलीप कुमारचा एक चित्रपट 'नया दौर' चे पोस्टर सरकारने बदलावयला सांगितले होते. कारण त्या पोस्टरमध्ये दिलीपकुमारांनी आपल्या हातात नांगर धरल्याचे चित्र होते. नांगर एक राजकीय पक्षाचे निवडणुक चिन्ह होते.

गुलजार यांनी बनवलेली ‘आंधी’ तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या जीवनावर भाष्य करीत असल्याचे सांगत केंद्र सरकारने त्या चित्रपटावर बंदी घातली होती. काही चित्रपट असेही राहिले आहेत जे हिंदू समाजातील जाती-जमातींना आवडले नाहीत. आमिर खानची पत्नी किरण रावचा चित्रपच ‘धोबी घाट’ या चित्रपटाला धोबी समाजाचा विरोध करावा लागला होता. अक्षयकुमारच्या ‘पटियाला हाऊस’ला धार्मिक वादात अडकवण्याचा प्रय़त्न करण्यात आला. ‘दम मारो दम’मध्ये दीपिका पादुकोणच्या आयटम साँगवर आणि गोवा पोलिसाचे गुन्हेगारी विश्व यावर वाद झाला होता.

'आजा नचले' आणि 'कमीने' यातील गाण्यातील शब्दांबाबत जातीचा उल्लेख असल्याचे सांगत विरोध केली होता. 'नॉटी एट फॉर्टी’, ‘रागिनी एमएमएस’, ‘देल्ही बेली’, ‘मर्डर-2′, ‘गांधी टू हिटलर’, ‘सिंघम’ आदी चित्रपटही वेगवेगळ्या कारणांनी गाजत राहिलेच. यातील काही चित्रपटाचे वाद चित्रपट प्रदर्शित होण्याआधीच सुटले तर काहीचे वाद रिलीजनंतर निवळले. काही चित्रपट असेही आहेत जे अशा वादामुळे खूप उशीरा किंवा कधीच रिलीज झाले नाहीत.

2011 मध्ये आलेल्या आरक्षण चित्रपटाबाबत असेच काहीसे झाले होते. यात काही संघटनांनी या चित्रपटात मागास लोकांबाबत गैरउदगार काढल्याचे सांगत बंदीची मागणी केली होती. 2010 मध्येही शाहरुख खानच्या 'माय नेम इज खान' चित्रपटाला शिवसेनेच्या विरोधाचा सामना करावा लागला होता. नंदिता दास निर्मित 'फिराक' (2008) ला गुजरातमध्ये बंदी घातली गेली होती. 2002 मध्ये गुजरातमध्ये झालेल्या जातीय दंगलीची पार्श्वभूमीवर आधारित हा चित्रपट होता. त्याला दोन राष्ट्रीय पुरस्कार मिळाले होते. याचबरोबर राहुल ढोलकियाचा 'परजानियां' आणि अनुराग कश्यपच्या 'ब्लॅक फ्रायडे' ला वादाचा फटका बसला होता. मिस्टर परफेक्शनिस्ट आमिर खानच्या 'फना'ला गुजरातमध्ये बंदीचा सामना करावा लागला होता.

त्याचमुळे हा प्रश्न निर्माण होतो की, सुमारे 2000 वर्षाच्या आपल्या जुन्या धर्म व्‍यवस्‍थेला अशा चित्रपटामुळे नुकसान पोहचते का?. इतका अशक्त आपला धर्म आहे का की, चित्रपटात काही दृश्ये दाखविली म्हणून तो ढासळेल किंवा लोकांचा त्याच्यावरील विश्वास उडेल. आपण हे विसरायला नको आहे की चित्रपट हे आपल्या समाजातील आरसा आहे. जे समाजात घडते त्यावरच कोणाला तरी आपल्या पद्धतीने व कलेने भाष्य करावे वाटते. आपले म्हणणे इतरांपर्यंत जावे, समाजात जावे यातून चांगले काय वाईट काय हे ज्याने-त्याने स्वीकारावे, अशी आपली राजकीय-सामाजिक व्यवस्था सांगत असतानाही आपण सांस्कृतिक दहशतवाद बनवतोय की त्याला बळी पडतोय, असे मनोमन वाटायला लागते.