आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

तृणमूल खासदाराची जीभ घसरली, केंद्रीय मंत्र्यांना म्‍हटले \'डान्‍सर\'

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

कोलकाता- केंद्रीय मंत्र्यांना नर्तकीची उपमा देऊन तृणमूल तृणमूल कॉंग्रेसच्‍या खासदार काकोली घोष दस्‍तीदार यांनी रविवारी खळबळ उडवून दिली. फक्‍त मेकअप केल्‍यामुळे कोणी नेता बनू शकत नसल्‍याचेही त्‍यांनी पुढे म्‍हटले.

दस्‍तीदार म्‍हणाल्‍या, फक्‍त नाचण्‍याने आणि मेकअप करण्‍याने कोणी नेता बनू शकत नाही. त्‍या (दीपा दासमुन्‍शी) मेकअप करून कधीच नेता बनू शकणार नाहीत. यावेळी त्‍यांनी दासमुन्‍शींना पश्चिम बंगालमध्‍ये तृणमूल कॉंग्रेसच्‍या खासदारांची संख्‍या 19 वरून एक वर आणून दाखवण्‍याचे आव्‍हानही दिले. त्‍या म्‍हणाल्‍या,' मी त्‍यांना सांगू इच्छिते की, त्‍यांनी ममता बॅनर्जींना आव्‍हान देण्‍याची चूक करू नये. मी त्‍यांना आव्‍हान देते की त्‍यांनी पुढची निवडणूक माझ्या मतदार संघात लढवून, मला पराभूत करून दाखवावे.'

दस्‍तीदार यांच्‍या या वक्‍तव्‍यावर दासमुन्‍शी यांनी अद्याप काही उत्तर दिलेले नाही. त्‍या म्‍हणाल्‍या,' मी अशा पद्धतीच्‍या चिथावणीखोर आणि खालच्‍या दर्जाच्‍या टीकेबाबत काही बोलू इच्छित नाही. अशा प्रकारची शेरेबाजी बंगालच्‍या परंपरेविरूद्ध आहेत. आणि कॉंग्रेसच्‍या संस्‍कृतीलाही शोभणारे नाही.'

दासमुन्‍शी या पश्चिम बंगालमधील कुशासन येथून निवडणूक लढवणार असल्‍याने त्‍यांना तृणमूल खासदाराने टार्गेट बनवले असल्‍याचे, प्रदेश कॉंग्रेसचे प्रदीप भट्टाचार्य यांनी म्‍हटले.