आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बुकशेल्फ: हायफाय आचार्‍यांच्या पुस्तकांची भट्टी

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली- स्वादिष्ट पदार्थ तयार करणारे शेफ किंवा हायफाय आचारी आता अशा पदार्थांवरील चटपटीत, खमंग पुस्तके लिहिण्याकडे वळली आहेत. प्रत्येकालाच पाककृतीमध्ये संशोधन आणि वैविध्य आणण्यासाठी अशा पुस्तकांची गरज भासू लागली आहे. म्हणूनच गेल्या दशकभरात शेफ मंडळींची ही पुस्तकांची रेसिपी दुकाने आणि घरातील बुकशेल्फची शान ठरू लागली आहेत.
पाककलेवर आधारित पुस्तके लिहिण्याकडे कल वाढल्यामुळे या विषयावरील पुस्तकांची केवळ संख्यात्मकदृष्ट्याच नव्हे तर गुणात्मक पातळीवरदेखील वाढ झाल्याचे सांगण्यात येते. अनेक कुक लेखनाकडे वळले आहेत. दहा वर्षांपूर्वी या विषयावरील पुस्तके दुर्मिळ होती; परंतु नंतरच्या काळात मुख्य प्रवाहात पाककलेचे महत्त्व मान्य करण्यात आले.त्यातून या विषयावरील पुस्तकांची संख्या चांगलीच वाढली, असे सेलिब्रिटी शेफ आदित्य बाल यांनी सांगितले. बाल यांनीही पाककलेबरोबरच ‘द चख ले इंडिया कुकबुक ’ द्वारे पुस्तकात आपला हात आजमावला आहे.

व्हेज कुकबुक्सचा ट्रेंड
व्हेजिटेरियन हा आता फॅशन स्टेटमेंट आहे. त्यामुळे व्हेज कुकबुक्सचा ट्रेंड सध्या पाहायला मिळतो. त्याशिवाय रेसिपी व्यतिरिक्त पुस्तकांतून विनोद, आरोग्यविषयक टिप्स अशा गोष्टींचाही समावेश करण्यात येत असल्याचे पाहायला मिळते.

'' प्रत्येकाचा विचार करून आता कुकबुक्सची निर्मिती होत आहे. अगोदर ही पुस्तके शाही पनीर, दाल मखनी, बटर किचन इत्यादी टिपिकल स्वरूपाची होती. आता त्यात मोठा बदल झाला आहे. प्रत्येकाला त्याच्या गरजेनुसार पुस्तकांची उपलब्धता होऊ लागली आहे.''
-विकास खन्ना, ‘माय ग्रेट इंडियन कुक बुक’ चे लेखक.