Home »National »Delhi» Court Orders In-Camera Proceedings In The Case Of Delhi Gang Rape

दिल्‍ली गँगरेप प्रकरणाची आता 'इन कॅमेरा' सुनावणी, वार्तांकनासही मज्‍जाव

वृत्तसंस्‍था | Jan 07, 2013, 15:02 PM IST

  • दिल्‍ली गँगरेप प्रकरणाची आता 'इन कॅमेरा' सुनावणी, वार्तांकनासही मज्‍जाव

नवी दिल्‍ली- दिल्लीतील सामूहिक बलात्कार प्रकरणाची सुनावणी आता इन कॅमेरा होणार आहे. तसेच या खटल्‍याचे वार्तांकन करण्‍यास प्रसारमाध्‍यमांना मनाई करण्‍यात आली आहे. या प्रकरणातील 5 आरोपींना आज न्‍यायालयात हजर करण्‍यात आले. त्‍यावेळी न्‍यायालयात मोठा गोंधळ उडाला. दोन वकिल आरोपींची बाजू मांडण्‍यास उभे झाले. त्‍यांना इतर वकिलांनी तीव्र विरोध केला. अखेर न्‍यायमुर्तींनी त्‍यांच्‍या चेंबरमध्‍ये सुनावणी घेतली.

या प्रकरणातील सहापैकी 5 आरोपींना सोमवारी दिल्लीतील साकेत येथील न्यायालयात कडेकोट बंदोबस्तात नेण्यात आले. परंतु, न्‍यायालयात पत्रकार, वकील आणि सामान्य नागरिकांची प्रचंड गर्दी होती. त्‍यामुळे पोलिसांनी आरोपींना एवढ्या गर्दीत हजर करण्‍यास नकार दिला. महानगर न्यायदंडाधिकारी नम्रता अगरवाल यांच्यासमोर सुनावणी होणार होती. अखेर न्‍यायमुर्तींनी त्‍याच्‍या चेंबरमध्‍ये सुनावणी घेतली. या प्रकरणी इन कॅमेरा सुनावणीचा निर्णय त्‍यांनी दिला.

आरोपींची बाजू मांडण्‍यास आलेल्‍या वकिलांना न्‍यायमुर्तींनी तिहार तुरुंगात जाऊन वकिलपत्रावर आरोपींची स्‍वाक्षरी घेऊन येण्‍यास सांगितले. आरोपींची बाजू कोणताही वकिल मांडणार नाही, असा निर्णय वकिलांच्‍या विविध संघटनांनी घेतला आहे. त्‍यामुळे न्‍यायालयातच वकिलांमध्‍ये जोरदार बाचाबाची झाली. दरम्यान, आपल्याला अल्पवयीन म्हणवणा-या सहाव्या आरोपीचे वय अद्याप निश्चित झालेले नाही. त्‍याच्‍या अस्थि घनता तपासणीचा अहवाल अद्याप आलेला नाही.

Next Article

Recommended