आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

गायीचे दूध बाळांसाठी घातक

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

कोलकाता - शेकडो वर्षांपासून गायीचे दूध लहान बाळांसाठी वरदान असल्याचे मानले जात होते, परंतु ते बाळाच्या आरोग्याला घातक असल्याचा धक्कादायक अहवाल जाहीर झाला आहे.
दूधामध्ये प्रथिनांची उच्च पातळी असते. उच्च दर्जाची अशी प्रथिने लहान मुलांच्या किडनीला धोकादायक ठरू शकते, असा इशारा बायोकेमिस्ट्री अँड न्यूट्रिशन, ऑल इंडिया इन्स्टिट्यूट ऑफ हायजीन अँड पब्लिक हेल्थचे प्रमुख देवनाथ चौधरी यांनी दिला आहे. गायीच्या दुधापेक्षा इतर काही पर्यायांचा विचार करावा. त्यासाठी आपल्या फॅमिली डॉक्टरचा सल्ला घेतलेला बरा, असे तिस-या राष्ट्रीय कुटुंब आरोग्य पाहणीतून स्पष्ट झाले आहे. भारतात तान्हुल्या मुलांसाठी गायीचे दूध फायदेशीर असल्याचे सांगून हजारो वर्षांपासून ते वापरण्याची परंपरा आहे. परंतु आधुनिक काळात हे असुरक्षित बनले आहे. गायीच्या दुधात मोठ्या प्रमाणात कीटकनाशके व इतर घटक आढळून आले आहेत.
संशोधनः दुध प्‍या स्‍मरणशक्ती वाढवा
चीनमधुन दुध आयातीवर बंदी