आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सीपीएमच्‍या माजी आमदारासह दोन नेत्‍यांची पश्चिम बंगालमध्‍ये हत्‍या

11 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

बुरद्वान (पश्‍चिम बंगाल) - मार्क्‍सवादी कम्युनिस्ट पक्षाचे (सीपीएम) माजी आमदार प्रदिप ताह यांच्‍यासह दोन नेत्यांचे अपहरण करून, त्यांची हत्या केल्याची घटना उघडकीस आली आहे. प्रदिप ताह हे उत्तर बुरद्वान येथील माजी आमदार होते.
जिल्ह्यातील देवानदिघी भागात हे हत्‍याकांड झाले आहे. सीपीएमच्‍या कार्यकर्त्‍यांनी याप्रकरणी तृणमूल कॉंग्रेसवर आरोप केले आहेत. देवानदिघी भागात सीपीएमने एक रॅली काढली होती. 28 फेब्रुवारी रोजी पुकारलेल्‍या देशव्‍यापी औद्योगिक संपाला पाठींबा देण्‍यासाठी ही रॅली काढण्‍यात आली होती. रॅलीवर हल्ला करण्‍यात आला. दोन नेत्यांचे अपहरण केले. अपहरणानंतर प्रदिप ताह व आणखी एका नेत्याची आज दुपारी हत्या झाल्याचे उघड झाले. तृणमुलने मात्र या हत्‍याकांडामध्‍ये कोणताही सबंध नसल्‍याचे स्‍पष्‍ट केले आहे.