आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Crime Awareness To Public Information In Hariyana Bus

गुन्हेगारांचे फिंगर प्रिंट पुसू नका; हरियानातील बसमध्ये सूचना

10 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

कुरुक्षेत्र: पश्चात्तापापेक्षा जागरुकता चांगली, असा विचार करून हरियाणाच्या पोलिसांनी गुन्ह्यांबाबत जनतेला जागृत करायचे ठरवले आहे.
एखादा गुन्हा घडतो तेव्हा अजाणतेपणे लोकांकडून गुन्हेगारांच्या बोटांचे ठसे जाणते-अजाणतेपणी पुसले जातात. त्यामुळे तपासात अडचणी येतात. त्यामुळे गुन्हा घडताच जनतेने काय करावे किंवा काय करू नये याबाबत सूचना असलेल्या पट्ट्या हरियाणा रोडवेजच्या सर्व बसमध्ये लावण्याचे काम सुरू केले आहे. गुन्हा घडलेल्या ठिकाणी कुठल्याही वस्तूला हात लावू नये यासारख्या सूचना या पट्ट्यांवर छापण्यात आल्या आहेत. लोकांमध्ये गुन्ह्यांबाबत जागरुकता नसल्यामुळे अनेकदा ख-या गुन्हेगारापर्यंत पोलिसांचे हात पोहोचत नाहीत.
दहा बसमध्ये सूचना
कुरुक्षेत्र रोडवेज डेपोचे कार्यशाळा व्यवस्थापक विकास नरवाल यांनी सांगितले की, सामान्य लोकांपर्यंत संदेश पोहोचवण्यासाठी बस एक प्रभावी आणि सोपे माध्यम आहे. त्यामुळे पोलिसांनी पहिल्या टप्प्यात दहा बसमध्ये सूचना पट्ट्या लावल्या आहेत.
पुरावे नष्ट होतात
फिंगर प्रिंट तज्ज्ञ अशोककुमार यांनी सांगितले की, गुन्हा घडतो तेव्हा पोलिसांच्या आधी लोक तेथे पोहोचलेले असतात. गुन्हेगाराच्या बोटाचे ठसे तेथील अनेक वस्तूंवर उमटलेले असतात. लोकांनी या वस्तू हाताळल्यास हे ठसे नष्ट होतात आणि त्यामुळे पुराव्याअभावी अनेकदा गुन्हेगार पोलिसांच्या जाळ्यात येत नाहीत.