आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

हत्येसारखा गंभीर आरोप असणा-या खासदारांना कस्टमकडून झुकते माप

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

चंदीगड - सामान्य नागरिकावर गुन्हेगारीविषयक आरोप असतील तर त्याला शस्त्र मिळणे दूर, परवाना मिळणे अवघड काम असते. मात्र, खासदार त्यास अपवाद आहेत. 2001 ते 2012 दरम्यान 82 खासदारांनी सरकारकडून बंदूक खरेदी केली. त्यातील 18 विरोधात गंभीर आरोपाचे गुन्हे दाखल आहेत. आरटीआयअंतर्गत ही माहिती मिळाली आहे.
आरटीआय कार्यकर्ते अंबरीश पांडे यांनी खासदारांच्या बंदूक खरेदीबाबतची माहिती मागितली होती. बंदूक मिळवणा-या खासदारांमध्ये उत्तर प्रदेशातील अतीक अहमदवर 44 गुन्हे दाखल आहेत. यामध्ये हत्या आणि हत्येचा प्रयत्न केल्याच्या प्रत्येकी सहा गुन्ह्यांचा समावेश आहे. अबू असिम आझमी(महाराष्ट्र) आणि राकेश सचान (उत्तर प्रदेश) यांच्यावरही प्रत्येकी सात प्रकरणे दाखल आहेत.
कस्टम विभागाकडून मिळाली शस्त्रे - कस्टम विभागाने जप्त केलेली शस्त्रे खासदारांना विकली जातात. शस्त्रावर बंदी असेल तर सरकारकडून त्यासाठी परवानगी घेणे आवश्यक ठरते. कस्टम विभागाने ‘पहिल्यांदा या, पहिल्यांदा घ्या’ या धोरणानुसार खासदारांना शस्त्र खरेदी केली जाते. परवाना असतानादेखील सामान्य व्यक्ती ही शस्त्रे खरेदी करू शकत नाही.
आरोपींना परवाना नाकारला जातो - सामान्य नागरिकावर एखादा गुन्हा दाखल झाला असेल तर शस्त्र परवाना नाकारला जातो. एखाद्यावर हत्या अथवा हत्येचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल असेल तर त्याचा परवाना जप्त केला जातो. मात्र, खासदारांविरुद्ध गुन्हे दाखल असताना त्यांना घातक शस्त्रे विकण्यात आली. - हरीश भारद्वाज, ज्येष्ठ विधिज्ञ
खासदाराचे नाव शस्त्र खटले प्रलंबित
अतीक अहमद रगर रायफल 77 44
अबू आझमी 9 एमएम पिस्तूल 7
राकेश सचान पी-बरेटा पिस्तूल 7
पी.डी.इलनोवन पॉइंट 22 बोअर एस्टा पिस्तूल 5
अफजल अंसारी पॉइंट 32 बोअर एस्टा पिस्तूल 4
ब्रजेश पाठक 7.65 एमएम चेक पिस्तूल 4
कपिल मुनी रगर रिवॉल्हर, पॉइंट 357 मॅग्नम 4
संगीता देव 7.65 एमएम चेक पिस्तूल 4
राकेश पांडे एस अ‍ॅँड डब्ल्यू रिव्हॉल्व्हर 3
आर.के.सिंह पटेल ब्राउनिंग पिस्तुल, पॉइंट 32 बोअर 3
धर्मराज सिंह पॉइंट 32 रिवॉल्व्हर 3
एस.सईद उज्जमां 7.65 वॉल्थर पिस्तुल 2
दया भाई पटेल पॉइंट 32 बोअर रिवॉल्व्हर 1
सी.कुप्पुस्वामी 7.65 एमएम वाल्थर पिस्तुल 1
जोएल उरांव पॉइंट 32 बोअर रिवॉल्व्हर 1
आर.के. पांडे कार्ल वाल्थर पिस्तुल 9 एमएम कुर्ज 1
रवींद्र सिंह पांडे पार्कर हेल रायफल 30.06 1