आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Crual Offender In Delhi Gangarape Declear Inmature

दिल्ली सामुहिक बलात्काराचा \'तो\' सर्वात क्रूर आरोपी ठरला अल्पवयीन!

10 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली - दिल्ली गँगरेप प्रकरणातील सर्वात नराधम आरोपीला अल्पवयीन ठरवण्यात आले आहे. कायद्यानुसार आता त्याला कठोर शिक्षा होणार नाही. ज्युवेनाइल जस्टिस बोर्डाने शाळेच्या दाखल्यावरील आरोपीची जन्मतारीख योग्य ठरवली आहे. आरोपीची बोन टेस्ट करण्याची मागणीही फेटाळून लावली आहे. दिल्ली पोलिस या निर्णयाला हायकोर्टात आव्हान देणार आहेत.

शाळेच्या प्रमाणपत्रात आरोपीची जन्मतारीख 4 जून 1995 नोंदवलेली आहे. त्यानुसार गुन्हा घडला त्या वेळी (16 डिसेंबर 2012) त्याचे वय 17 वर्षे 6 महिने 12 दिवसांचे होते. 15 जानेवारी रोजी सुनावणीच्या वेळी आरोपी शिकलेल्या शाळेचे मुख्याध्यापक बोर्डासमोर हजर झालेले होते. शाळेच्या रजिस्टरची छायांकित प्रत त्यांनी सादर केली होती. आरोपीचे वय सिद्ध करण्याचा हाच एकमेव दस्तऐवज आहे.

आता मार्ग काय
हायकोर्ट बोन अ‍ॅसिफिकेशन टेस्टला परवानगी देऊ शकते. परंतु तज्ज्ञांच्या मते टेस्टमधून वयाची नेमकी माहिती मिळू शकत नाही. दोन वर्षे कमी किंवा जास्त भरण्याची शक्यता त्यात असते.
अल्पवयीन समजून सुनावणी
*पाच आरोपींसोबत फास्ट ट्रॅक कोर्टात सहाव्याची सुनावणी होणार नाही.
*गुन्हा सिद्ध झाल्यानंतरही तुरुंगात पाठवता येणार नाही. जास्तीत जास्त 3 वर्षे सुधारगृहात राहावे लागेल.
*अल्पवयीन आरोपी जामीन अर्ज दाखल करू शकतो. त्याला जामीन मिळूही शकतो. केवळ पालकांना त्याची जबाबदारी घ्यावी लागते.
अमानुषपणाचा कळस
आणि कायद्यातील त्रुटी

16 डिसेंबर रोजी धावत्या बसमध्ये विद्यार्थिनीसोबत सर्वाधिक पाशवीपणा याच आरोपीने केला होता.
*याच आरोपीने तिच्यावर दोन वेळा अत्याचार केले.
*याच आरोपीने तरुणीच्या आतड्यावर सळईने वार केले. तेच पीडितेच्या मृत्यूचे सर्वात मोठे कारण ठरले.
*याच आरोपीने तरुणीला बसमधून फेकून देण्याचा सल्ला आपल्या इतर साथीदारांना दिला होता.
(दिल्ली पोलिसांच्या माहितीनुसार)

कायद्यातील कलमानुसार, 18 वर्षांचा होताच हा आरोपी सुटू शकतो
ज्युवेनाइल जस्टिस अ‍ॅक्टच्या कलम 15 (जी) नुसार कोणत्याही अल्पवयीनास जास्तीत जास्त तीन वर्षे बालसुधारगृहात ठेवले जाऊ शकते. त्यानंतर प्रोबेशनवर सोडले जाईल. त्याच वेळी कायद्यातील कलम 16 नुसार दोषीला वयाची 18 वर्षे पूर्ण होईपर्यंतच सुधारगृहात ठेवता येऊ शकते. त्यानंतर तुरुंगातही पाठवता येऊ शकत नाही. सहावा आरोपी यंदा 4 जून रोजी 18 वर्षांचा होईल. म्हणजेच 4 जूननंतर सुटू शकतो.
पीडितेचे वडील म्हणतात, हवे तर कायदा बदला; पण सर्वांना फाशी द्या
अल्पवयीनाला सर्वात आधी शिक्षा व्हावी असे माझ्या कुटुंबाला वाटते. त्यानेच सर्वाधिक पाशवीपणा केला. सर्वांनाच मृत्युदंड व्हावा. मग भले सरकारला कायदा बदलावा लागला तरी चालेल.- पीडित मुलीचे वडील
आरोपीची आई म्हणते, घरातून गेला होता, तेव्हा तो निरागस होता मुलाचे वय सिद्ध करण्याचा कोणताही पुरावा माझ्याकडे नाही. 11 वर्षे वयाचा असताना तो घरातून गेला होता. निष्पाप तर तेव्हा होता. गुन्हा केला आहे, तर त्याला कठोर शिक्षा व्हायलाच पाहिजे.- अल्पवयीन आरोपीची आई