आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

भारतात सांस्कृतिक आणीबाणी : रश्दी

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली - कोलकाता-भारतात सांस्कृतिक आणीबाणीसारखी परिस्थिती असल्याचा आरोप वादग्रस्त लेखक सलमान रश्दी यांनी केला आहे. कोलकातामध्ये न जाण्यास मुख्यमंत्री ममता बॅनर्जी जबाबदार असल्याचा आरोप त्यांनी केला. दरम्यान, दलित विरोधी वक्तव्य करणारे समाजशास्त्रज्ञ आशिष नंदी यांना सर्वोच्‍च न्यायालयाने दिलासा दिला आहे. त्यांच्या अटकेवर स्थगिती आणली आहे. अभिनेता कमल हासन यांच्यासाठीही शुक्रवार आश्वासक राहिला. त्यांचा चित्रपट ‘विश्वरूपम ’ उत्तर भारतात निर्विघ्नपणे प्रदर्शित झाला आहे.
सलमान नव्हे, शैतान रश्दी : रश्दी यांनी जगाला घाणेरडे साहित्य देण्याशिवाय काहीही केलेले नाही. ते सलमान रश्दी नसून शैतान रश्दी आहेत, असे तृणमूलचे खासदार सुलतान अहमद यांनी म्हटले आहे.

ममता बॅनर्जी यांच्या आदेशानंतर कोलकात्यात जाऊ दिले नाही
कोलकाता दौरा रद्द होण्यामागे पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जींचा हात असल्याचा आरोप वादग्रस्त लेखक सलमान रश्दी यांनी केला आहे.कोलकात्यात पाऊल ठेवल्यास तत्काळ पुढच्या विमानाने मला परत पाठवण्याचे आदेश ममतांनी पोलिसांना दिले होते, असा आरोप रश्दी यांनी केला आहे. मला रोखण्याचे आदेश ममतांनीच पोलिसांना दिले होते, असे ते म्हणाले. मिडनाइट्स चिल्ड्रन चित्रपटाच्या प्रीमियरसाठी रश्दी बुधवारी कोलकात्याला जाणार होते; परंतु ऐनवेळी त्यांचा दौरा रद्द करण्यात आला होता. कोलकात्यातील अल्पसंख्यकांच्या विरोधानंतर रश्दी यांचा दौरा करण्यात आला. या संदर्भात त्यांनी शुक्रवारी मायक्रोब्लॉगिंग साइट ट्विटरवर आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. पोलिसांनीच माझ्या दौ-या चा कार्यक्रम प्रसारमाध्यमांना दिला. मुस्लिम नेत्यांनाही सांगून आंदोलन भडकावले असा गंभीर आरोपही रश्दी यांनी कोलकाता पोलिसांवर केला. कोलकाता साहित्य उत्सवाचेही मला निमंत्रण होते.