आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Cwg Scam: Court Allows Kalmadi To Visit London For Olympics

आरोपी कलमाडींना ऑलिम्पिक वारीसाठी कोर्टाची परवानगी

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली - कॉमनवेल्थ क्रीडा स्पर्धेतील आर्थिक गैरव्यवहार प्रकरणातील प्रमुख आरोपी सुरेश कलमाडी यांना ऑलिम्पिक स्पर्धेसाठी लंडनला जाण्याची परवानगी दिल्ली कोर्टाने दिली आहे.
विशेष सीबीआय कोर्टाचे न्यायाधीश तलवंत सिंग यांनी सुरेश कलमाडींना २६ जुलै ते १३ ऑगस्ट या दरम्यान ऑलिम्पिक स्पर्धेसाठी लंडनला जाण्याची परवानगी दिली. यासाठी कोर्टाने सुरेश कलमाडींना १० लाख रुपयांचा बॉंण्ड जामीनस्वरुपात जमा करण्यास सांगितले आहे.
२५ एप्रिल २०११ रोजी सुरेश कलमाडी यांना अटक करण्यात आली होती. त्यानंतर तिहार येथील कारागृहात 9 महिन्यांचा कारावास भोगल्यानंतर २० जानेवारी २०१२ रोजी त्यांची जामिनावर मुक्तता करण्यात आली.
इंटरनॅशनल असोसिएशन ऑफ ऍथलेटिक्‍स फेडरेशन (आयएएएफ) काऊन्सिलचा मी सदस्य असल्याने मला लंडनमध्ये होणाऱ्या ऑलिंपिक स्पर्धेत हजर राहण्याची परवानगी द्यावी, अशी याचिका त्यांनी सीबीआय कोर्टाकडे काही दिवसांपूर्वी दाखल केली होती.
नऊ महिन्यांनंतर सुरेश कलमाडी पुण्यात दाखल