आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सायबर धोक्यापासून मुलांना वाचवणारे सॉफ्टवेअर

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

कोलकाता- इंटरनेटच्या अफाट जगात लहान मुलांचा संचार दिवसेंदिवस मुक्तपणे होत आहे. आपण काय करीत आहोत हे पालकांना कळू नये याची आटोकाट खबरदारीही मुले घेतात. पण आता काही सॉफ्टवेअर टूल्स वापरून पालकही त्यांच्यावर हुशारीने मात करू शकतात. तसेच या टूल्सच्या मदतीने सायबर जगातील धोकेही टळतील, असे मत तज्ज्ञांनी व्यक्त केले आहे.
इंटरनेट सिक्युरिटी फर्म ट्रेंड मायक्रोचे व्यवस्थापक अमित नाथ यांनी सांगितले की, इंटरनेट वापराबाबत मुलांवर करडी नजर ठेवूनही उपयोग होत नाही. कारण आजकालची मुले स्मार्ट आहेत. त्यामुळे अशा सॉफ्टवेअरचा वापर उपयुक्त ठरेल. इंटरनेट सिक्युरिटी सिस्टिम, पॅरेंटल कंट्रोल्स, बिहेविअरल मॉनिटरिंग आणि रूटकिट डिटेक्शन व रिमूव्हलचा समावेश असलेल्या या सॉफ्टवेअरच्या मदतीने पालक मुलांच्या खोडकरपणावर ऑनलाइन लक्ष ठेवू शकतील.
मुलांच्या बेजबाबदार इंटरनेट वापरातून उद्भवणाºया धोक्यांबाबत ग्लोबल सिक्युरिटी टेक फर्म मॅकअ‍ॅफीने भारतातील दहा शहरांमध्ये सर्वेक्षण केले असता श्रीमंतांच्या मुलांपैकी 62 टक्के मुले आपली व्यक्तिगत माहिती आॅनलाइन शेअर करतात, असे आढळून आले. इ-टेक्निक्स डॉट इनचे संस्थापक अध्यक्ष रोहित चौधरी यांनी सांगितले की, आक्षेपार्ह चित्रे आणि मजकूर, चॅटरूम किंवा ई-मेलद्वारे लैंगिक विकृत लोकांनी भुलवणे, सायबर छळ, डिजिटल पायरसी, असे अनेक धोके मुलांच्या इंटरनेट वापरादरम्यान असतात. पालकांना वेळ नसल्यामुळे किंवा तंत्रज्ञानाची सखोल ओळख नसल्यामुळे ते मुलांच्या आॅनलाइन हालचालींवर लक्ष ठेवू शकत नाहीत. अशा वेळी बाजारात उपलब्ध असलेली ही सॉफ्टवेअर्स त्यांना मुलांनी वापरलेल्या साइट््सची यादीच सोपवतात आणि पालकांच्या इच्छेनुसार त्या वेबसाइट ब्लॉकही करू शकतात, असेही चौधरी म्हणाले.
मॅकअ‍ॅफीच्या सर्वेक्षणात असे दिसून आले की, 32 टक्के मुलांना सायबर धोक्यांची जाणीव नाही आणि 12 टक्के मुलांनी कबूल केले की, सायबर हल्ल्याचा त्यांना फटका बसलेला आहे. सुट्यांमध्ये आपल्या वर्गमित्रांशी संपर्कात राहण्यासाठी चॅटरूम आणि सोशल नेटवर्किंग साइटचा वापर करणाºया मुलांना ऑनलाइन हल्ल्याचा धोका सर्वाधिक असतो, असेही निष्पन्न झाले आहे.
टायटॅनियम मॅक्झिमम- ट्रेंड मायक्रोने टायटॅनियम मॅक्झिमम नावाचे एक भक्कम आणि भरपूर फीचर्स असलेले आॅनलाइन प्रोटेक्शन सॉफ्टवेअर तयार केले आहे. मुलांच्या खांद्यावरून कॉम्प्युटरमध्ये डोकावून न पाहताही या सॉफ्टवेअरच्या मदतीने आक्षेपार्ह वेबसाइट्सपासून मुलांना दूर ठेवता येते, त्यांचा इंटरनेट वापराचा कालावधी ठरवता येतो आणि ते आॅनलाइन काय करतात याचा तपशील पाहता येतो.