आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Cyber Security Syllbus In All Over The University

देशभरातील विद्यापीठ्यामध्‍ये सायबर सुरक्षा अभ्‍यासक्रमांचा समावेश होणार

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक


नवी दिल्ली - सायबर सुरक्षा हा विषय लवकरच विद्यापीठ आणि तंत्रशिक्षण महाविद्यालयांच्या अभ्यासक्रमात समाविष्ट करण्यात येणार आहे. राष्ट्रीय सुरक्षेवरील कृती दलाच्या शिफारशींनुसार हा विषय अभ्यासक्रम समाविष्ट करण्याचा विचार सुरू आहे.

पदवी आणि पदव्युत्तर अभ्यासक्रमात सायबर सुरक्षा या विषयाचा समावेश करण्यात यावा असे पत्र विद्यापीठ अनुदान आयोगाने (यूजीसी) सर्व विद्यापीठांच्या कुलगुरुं ना पाठवले आहे असे सूत्रांनी सांगितले.सन 2011 मध्ये पंतप्रधान मनमोहनसिंग यांनी राष्ट्रीय सुरक्षा व्यवस्थेचा आढावा घेण्यासाठी कृती दलाची स्थापना केली होती. या कृती दलास अहवाल सादर करण्यास सांगितले होते. देशासमोरील राष्ट्रीय सुरक्षेचा आढावा घेतल्यानंतर कृती दलाने सरकारला शिफारशी केल्या होत्या.