आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

देशभरात गोरगरिबांना दीड लाख वस्त्रांचे वाटप

10 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

भोपाळ - सामाजिक जबाबदारीच्या भावनेतून दैनिक भास्कर समूहाने देशभरात वस्त्र अर्पण अभियान सुरू केले आहे. या अभियानात जागरूक वाचकांनी मोठ्या प्रमाणावर वस्त्र अर्पण करून आपल्या सामाजिक औदार्याचा एक अनोखा आदर्श प्रस्थापित केल्याबद्दल भास्कर समूहाच्या वतीने त्यांचे आभार व्यक्त करतो. या अभियानात विविध संस्थांसह समाजाच्या सर्वच घटकांनी भरभरून योगदान दिले. सामूहिक तसेच वैयक्तिक स्वरूपात सढळ हाताने मदत करण्यासाठी वाचकवर्ग पुढे आल्यामुळे या अभियानात दीड लाख वस्त्रे अर्पण करण्यात आली.
अभियानात जमा झालेले कपडे त्याच शहरातील गोरगरिबांच्या वसाहती, वृद्धाश्रम, अनाथाश्रम, दवाखाने तसेच रेल्वे स्थानक व शहर परिसरातील निराधार गरजुंना वाटण्यात आले. या वस्त्र अर्पण अभियानात थेट काळजाला भिडणारे अनेक प्रसंग आले. एका 90 वर्षांच्या आजोबांनी दोन किलोमीटर पायपीट करून आपल्या दिवंगत पत्नीचे सगळे कपडे याच विश्वासाने अर्पण करण्यासाठी आणले की या माध्यमातून हे कपडे गरजुंच्या कामास येतील. एका आजींनीही त्यांच्या दिवंगत पतिचे सर्व कपडे अर्पण करताना म्हटले की, या कपड्यांमुळे एखाद्या गरजुची मदत होईल ही भावनाच मनाला समाधान देते.
हे कपडे गोरगरीबांना देण्यात आले तेव्हा त्यांचे डोळे आनंदाने भरून आले. महागाईच्या दिवसात दोन वेळच्या अन्नाची भ्रांत असताना गरम कपडे कसे घेणार पण मिळालेले हे कपडे थंडीच्या दिवसात फार उपयोगी असल्याचे या गोरगरीबांनी सांगितले. या अभियानात मदत करणाºया वाचकांचा भास्कर समूह आभारी आहे. यापुढेही अशा प्रत्येक सामाजिक उपक्रमात समाजाचे असेच सहकार्य मिळेल याचा आम्हाला पूर्ण विश्वास आहे.

प्राप्त झालेले कपडे
मध्यप्रदेश व छत्तीसगड 35108
महाराष्ट्र 31769
राजस्थान 43420
गुजरात 27863
झारखंड 7815
हरियाणा 6498
पंजाब 3341
चंदिगड 3820
एकूण 159634