आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आशीष नंदी यांच्‍याविरोधात अ‍ॅट्रॉसिटी कायद्यांतर्गत गुन्‍हा दाखल

10 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

जयपूर- सध्या जयपूरमध्ये साहित्य संमेलन होत असून, हे संमेलन साहित्यापेक्षा वादग्रस्त चर्चांनी नेहमी गाजते. आता एक असाच वाद तयार झाला आहे. समाजशास्त्रज्ञ व पॉलिटिकल साइकोलॉजिस्ट आशीष नंदी यांनी शनिवारी एक वादग्रस्त वक्तव्य केले. एससी, एसटी व ओबीसी या मागासवर्गिय समाज भारतात सर्वांधिक भ्रष्टाचार करणा-यांमध्ये पुढे आहे. यांचे उदाहरण देताना त्यांनी मायावतींवर तोफ डागत हेच लोक भ्रष्टाचार पसरवत आहेत, असे वक्तव्य नंदी यांनी केले आहे. दलित आणि मागासवर्गीयांविरोधात वादग्रस्त वक्तव्य करणाऱ्या आशीष नंदी यांच्याविरोधात अ‍ॅट्रॉसिटी कायद्यांतर्गत जयपूरमध्‍ये गुन्‍हा दाखल झाला आहे.

ओबीसी आणि दलितांमध्ये भ्रष्टाचाराचे प्रमाण जास्त आहे, असे वादग्रस्‍त वक्तव्य समाजशास्त्रज्ञ आशीष नंदी यांनी जयपूर लिटरेचर फेस्‍टीव्‍हलमध्‍ये केले होते. नंदी यांच्या या वक्तव्यानंतर देशभरातून निषेध व्यक्त झाला. त्यांचावर गुन्हा दाखल करावा अशी मागणीही जोर धरत होती. त्या पार्शभूमीवर हा गुन्हा दाखल झाला आहे. तर नंदी यांनी आपल्या वक्तव्याचा विपर्यास केल्याचे म्हटले आहे. मला दलित आणि मागासवर्गींयाबाबत आदर आहे, असे नंदी यांनी स्‍पष्‍टीकरण देताना सांगितले.