आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

'त्‍या' अल्‍पवयीन आरोपीला जिवंत जाळण्‍याची होती 'दामिनी'ची इच्‍छा

10 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्‍ली- दिल्‍लीतील सामुहिक बलात्‍कार प्रकरणात दोन वेळा बलात्‍कार करणारा आणि 'दामिनी'ला जीवघेण्‍या जखमा देणारा सहावा आरोपी अल्‍पवयीन असल्‍याचा निर्वाळा देण्‍यात आल्‍यामुळे 'दामिनी'च्‍या कुटुंबियांना दुःख झाले आहे. या आरोपीची अस्थि तपासणी करुन त्‍याचे निश्चित वय शोधण्‍यात यावे, अशी मागणी दामिनीच्‍या वडिलांनी केली आहे. दरम्‍यान, दिल्‍ली सामुहिक बलात्‍काराची सुनावणी दिल्‍लीतच होणार आहे. सुनावणी दिल्‍लीबाहेर नेण्‍यास सर्वोच्‍च न्‍यायालयाने नकार दिला.

सामुहिक बलात्‍कार प्रकरणातील सहावा आरोपी अल्‍पयवयीन असल्‍याचा निर्वाळा ज्‍युव्‍हेनाईल जस्‍टीस बोर्डाने काल दिला. यावर नाराजी व्‍यक्त करताना दामिनीचे वडील म्‍हणाले, गावांमध्‍ये मुले उशीरा शाळेत जातात. त्‍यामुळे प्रवेश घेताना अनेक वेळा कमी वय सांगण्‍यात येते. या आरोपीला तर कठोर शिक्षा झाली पाहिजे. हा आरोपी अल्‍पवयीन ठरला तरीही त्‍याला अशी शिक्षा व्‍हावी, जेणेकरुन असा गुन्‍हा करण्‍यापूर्वी गुन्‍हेगार दहा वेळा विचार करतील. त्‍याला तर जिवंत जाळले पाहिजे. माझ्या मुलीचीही हीच इच्‍छा होती.