आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Dead Body Of Missing Trader From Pune Discovered

पुरात वाहुन गेलेल्‍या पुण्याच्या व्यापार्‍याचा मृतदेह पाच वर्षांनी सापडला

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

भावनगर (गुजरात)- पाच वर्षांपूर्वी भावनगरमध्ये बेपत्ता झालेले पुणे येथील व्यापारी केवलचंद्र सोनग्रा यांच्या मृतदेह हाती लागला आहे. एका शेतात तलावाचे खोदकाम सुरू असताना त्यांच्या मृतदेहाचा सापळा आढळून आला. त्याजवळ सापडलेल्या मोबाइल, घड्याळ, डायरी, बेल्ट, पाकीट आणि बुटांवरून त्यांची ओळख पटवण्यात आली. सप्टेंबर 2007 मध्ये नातलगांसह ते महापुरात वाहून गेले होते. पुण्याहून त्यांचे कुटुंबीय मंगळवारी येथे येणार आहेत. या घटनेत सहा बहिणींचे कुंकू पुसले गेले होते. पुणे येथील सोनग्रा आणि त्यांचे सहा साडू पालिताना येथे दर्शनासाठी आले होते. पुण्याला परतत असताना दुर्घटना घडली होती. सोनग्रा व त्यांचे साडू कारमध्ये होते, तर महिला बसमध्ये होत्या. कार नदीच्या महापुरात वाहून गेली होती. यातील भैरुमल सिरोही यांना वाचवण्यात यश आले होते. इतर पाच मृतदेह घटनेनंतर हाती लागले होते. केवलचंद यांचा ठावठिकाणा लागला नव्हता. त्यांचा मृतदेह आता सापडला आहे.