आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Debit And Credit Card Change In June For RBI Information

डेबिट आणि क्रेडिट कार्ड जूनपर्यंत बदलणार!

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

अहमदाबाद- डेबिट आणि क्रेडिट कार्डांच्या वापराची संपूर्ण व्यवस्थाच बदलण्यात येत आहे. त्यासाठी तुमच्याजवळील सध्याचे कार्डदेखील बदलले जातील. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने (आरबीआय) याबाबत सर्व बँकांना सूचना दिल्या आहेत. सुरक्षेच्या नव्या उपाययोजना करण्यात आलेले कार्ड 30 जूनपर्यंत सर्व ग्राहकांना देण्याच्या सूचना बँकांना देण्यात आल्या आहेत.
नवी कार्डे कॉल रेफरल सिस्टिमनुसार काम करतील. याचे वैशिष्ट्य म्हणजे शॉपिंग वगैरेच्या वेळी कार्ड स्वॅप केल्यानंतर बँकेकडून कार्डधारकाशी चर्चा केली जाईल. मगच देवाणघेवाणीचा व्यवहार पूर्ण केला जाईल. फसवणुकीच्या वाढत्या घटनांमुळे ही तजवीज आली आहे. एवढेच नाही तर व्यापारी, व्यावसायिकांनाही कार्ड स्वॅप करण्याच्या मशीन्स बदलून घ्याव्या लागणार आहेत. मुंबईत चार लाख विद्यार्थ्यांना डेबिट कार्ड. पान 9

ई-बँकिंगमध्ये काय सुधारणा
एका दिवसाच्या देवाणघेवाणीची मर्यादा ठरवून घेऊन ग्राहक बँकेला तशी सूचना देऊ शकतील. एखाद्या वेळी यापेक्षा अधिक रकमेचे व्यवहार करण्याची गरज भासलीच तर अतिरिक्त ऑथोरायझेशननंतरच बँक तशी परवानगी देईल. त्याचप्रमाणे एका दिवसात किती लोकांच्या खात्यात पैसे ट्रान्सफर करायचे हे ग्राहक ठरवू शकेल. एखाद्या नव्या लाभधारकाचे नाव जोडले जात असल्याबद्दल बँक आणि ग्राहकाला तत्काळ सूचना मिळेल, याचा चोख बंदोबस्त यात असेल.

अशी असेल कॉल रेफरल सिस्टिम
ऑथोराइज्ड कार्ड पेमेंट नेटवर्क तथा ग्राहकांचा ताळमेळ लावून बँकांना रेफरल सिस्टिम अमलात आणावी लागेल.

> कार्ड स्वॅप होताच ते जारी करणार्‍या बँकेला अलर्ट मिळेल.
> व्यापार्‍याला कार्ड नंबरच्या तपशिलासह बँकेशी संपर्क साधावा लागेल.
> बँक ग्राहकाशी चर्चा करील वा इतर कोणत्यातरी पद्धतीने त्याची खातरजमा करून घेईल
>व्यापार्‍याला यानंतर पुन्हा कार्ड स्वॅप करावे लागेल