आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सडलेल्या गव्हापासून पेट्रोल निर्मितीला मंजूरी

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक


कोटा (राजस्थान) - सडलेल्या गव्हापासून पेट्रोल तयार करण्याचे तंत्र जितेंद्र चौधरी या बारावीच्या विद्यार्थ्याने शोधून काढले आहे. त्याच्या या प्रकल्पाची निवड आयआयटी राजस्थानच्या युवा शास्त्रज्ञ स्पर्धेत (आयडियाज-2012) झाली आहे. 20 डिसेंबर रोजी झालेल्या या स्पर्धेच्या निकालाची घोषणा सोमवारी करण्यात आली. त्यात निवडलेल्या प्रतिभावंतांना लवकरच आयआयटी-राजस्थानच्या वतीने पुरस्कार दिले जातील. तो रिछा (जिल्हा रतलाम, म.प्र.) येथील मूळ रहिवासी आहे.