आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Defence Ministry Clears New Corps On China Border

भारत-चीन सीमेवर तैनातीसाठी लष्‍कराची नवीन पलटण

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्‍ली- सीमेवर चीनला उत्तर देण्‍यासाठी भारताने मोठा निर्णय घेतला आहे. सूत्रांकडून मिळालेल्‍या माहितीनुसार संरक्षण मंत्रालयाने मोठया विचाराअंती चीनच्‍या आक्रमक रणनीतीला उत्तर देण्‍यासाठी नव्‍या पलटणला मंजुरी दिली आहे. भारत-चीन सीमेवर ही ही पलटण तैनात करण्‍यात येईल.

काही दिवसांपासून चीन भारताबरोबरील लष्‍करी संबंध सुधारण्‍यासाठी चांगली वक्‍तव्‍ये करीत आहे. मात्र, भारताच्‍या मते पूर्व सीमेवर चीन आपली सक्रीयता वाढवत आहे. त्‍यावरील लक्ष विचलीत करण्‍यासाठी ते अशात-हेची प्रतिक्रिया देत आहेत.

जर चीनने तिबेटच्‍या आसपास कारगिलसारखा घुसखोरीचा प्रयत्‍न करू केला तर मांऊटन स्‍ट्राईक कॉर्प्‍स त्‍यांना प्रत्‍युत्तर देऊ शकेल यावर संरक्षण मंत्रालयाचा जोर असल्‍याचे सूत्रांकडून मिळालेल्‍या माहितीनुसार समजते. चीनच्‍या वाढत्‍या धोक्‍यामुळे नवी पलटण बनवण्‍याच्‍या योजनेवर 2010 पासूनच विचार सुरू होता. एक वर्षानंतर म्‍हणजे 2011 मध्‍ये कॅबिनेट समितीने या प्रस्‍तावास मंजुरी दिली होती. मात्र, मध्‍यंतरी ही योजना थंड बस्‍त्‍यात पडली होती.