Home | International | China | delhi, chaina

भारत-चीन युद्धनौकेत चकमक

वृत्तसंस्था | Update - Sep 02, 2011, 02:05 AM IST

व्हिएतनामच्या सागरी क्षेत्राजवळ ‘आयएनएस ऐरावत’ या युद्धनौकेची वाट चिनी नौदलाने रोखल्याच्या वृत्ताचा भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाकडून स्पष्ट शब्दांत इन्कार करण्यात आला आहे.

  • delhi, chaina

    व्हिएतनामच्या सागरी क्षेत्राजवळ ‘आयएनएस ऐरावत’ या युद्धनौकेची वाट चिनी नौदलाने रोखल्याच्या वृत्ताचा भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाकडून स्पष्ट शब्दांत इन्कार करण्यात आला आहे. ‘ऐरावत’ विनाअडथळा मार्गस्थ झाली. तिच्या मार्गावर युद्धानौका तसेच कोणतेही विमानदेखील नव्हते, असेही परराष्ट्र मंत्रालयाने स्पष्ट केले आहे.
    भारतीय ‘ऐरावत’ ही युद्धनौका चीनच्या सागरी क्षेत्रात आल्याने शेजारी देशाचे नौदल व ऐरावत यांच्यात धुमश्चक्री उडाली, असे वृत्त ब्रिटनमधील वर्तमानपत्राने दिली होती. ही घटना २३ जुलै रोजी घडली, असे परदेशी मीडियाने म्हटले होते.
    भारत देश दक्षिण चीन सागरासह सर्व आंतरराष्ट्रीय सागरी क्षेत्रातील निर्बंधाचे पालन करण्याच्या बाजूने आहे. सागरी प्रवासात सर्व देशांनी आंतरराष्ट्रीय नियमांचे काटेकोर पालन केले पाहिजे, असे भारताचे मत आहे. परराष्ट्र मंत्रालयाच्या वतीने ही बाब स्पष्ट करण्यात आली आहे. २३ जुलै रोजी ऐरावत निर्विघ्नपणे मार्गस्थ झाल्याचे परराष्ट्र खात्याने म्हटले आहे. दुसरीकडे चीनकडून या मुद्द्यावर कोणतीही पुष्टी करण्यात आली नाही.Trending