आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Delhi Court Frames Charges Against Sacked CWG Chief Suresh Kalmadi In CWG Scam Case.

राष्‍ट्रकूल घोटाळयाप्रकरणी कलमाडींसहित 10 जणांवर आरोप निश्चित

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्‍ली- राष्‍ट्रकूल क्रीडास्‍पर्धेतील भ्रष्‍टाचार प्रकरणी दिल्‍लीतील कोर्टाने आयोजन समितीचे निलंबित अध्‍यक्ष सुरेश कलमाडी यांच्‍यासहित 10 जणांवरील आरोप निश्चित केले आहे.

कलम 420, 120 ब, 201, 467, 468, 471 आणि 506 अंतर्गत आरोप निश्चित करण्‍यात आले. या सर्वांवर फसवणूक, कट रचणे तथा सरकारचे 90 कोटींपेक्षा जास्‍त रूपयांचे नुकसान केल्‍याचा आरोप निश्चित करण्‍यता आला आहे.

सीबीआयचे विशेष न्‍यायाधीश रविंद्र कौर यांनी दहा जानेवारीला आरोप निश्चित करण्‍यासाठी चार फेब्रुवारी तारीख दिली होती. आयोजन समितीचे महासचिव ललित भानोत हेही एक आरोपी आहेत. कोर्टाने 21 डिसेंबर 2012 रोजी भारतीय दंड संहिता तथा भ्रष्‍टाचार निवारण अधिनियमच्‍या वेगवेगळया कलमांनुसार कलमाडी आणि इतर नऊ जणांविरूद्ध आरोप निश्चित करण्‍याचे आदेश दिले होते.