आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करानवी दिल्ली- देशाची राजधानी दिल्लीतील सामूहिक बलात्काराचा बळी ठरलेली 'दामिनी' आज या जगात नाही. परंतु तिचा मोबाइल क्रमांक आजही तिच्या मित्राच्या सेलफोनमध्ये सुरक्षित आहे. तिचा नंबर त्याने डिलीट केलेला नाही. 'दामिनी'चा नंबर 'जेव्ही' नावाने त्याच्या मोबाईलमध्ये सुरक्षित आहे. 'जेव्ही' या संस्कृत शब्दाचा अर्थ 'जीवन' असा आहे. 'दामिनी' त्याला 'परफेक्ट मॅन' नावाने हाक मारायची. त्याला तिने एक ग्रे कलरचा टाय गिफ्ट केली होता आणि तेच तिचे शेवटचे गिफ्ट ठरले. दामिनीची शेवटची आठवण म्हणून त्याने तो टाय सांभाळून ठेवला आहे. संबंधीत तरुण 16 डिसेंबरच्या रात्री दामिनीसोबत होता. त्याने प्रसारमाध्यमांशी बोलताना आणखी काही नवे खुलासेही केले आहेत.
16 डिसेंबरच्या रात्री घडलेली 'ती' भयानक घटना आजही त्याच्या मनात घर करून राहिली आहे. त्या रात्री तो 'दामिनी'सोबतच होता. नराधमांनी 'दामिनी' इतकाच्या त्यालाही जखमा केला आहेत. त्याला उभे राहण्यासाठी एका काठीचा सहारा घ्यावा लागतो. माहिती तंत्रज्ञानाचा अभ्यासक असलेला 28 वर्षीय तरुणाने सांगितले की, तो दामिनीचा सगळ्यात जवळचा मित्र होता.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.