आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दिल्‍ली सामुहिक बलात्‍कारातील 'तो' आरोपी अल्‍पवयीनच असल्‍याची शाळेची माहिती

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्‍ली- दिल्लीमध्ये 16 डिसेंबरला झालेल्या सामुहिक बलात्काराच्या घटनेतील अल्‍पवयीन आरोपीच्‍या वयासंदर्भात अहवाल अद्याप आलेला नाही. परंतु, त्‍याच्‍या शाळेच्‍या मुख्‍याध्‍यापकांनी तो अल्‍पवयीनच असल्‍याचा दावा केला आहे. ज्युवेनाइल जस्टीस बोर्डासमोर त्‍यांनी जबाब नोंदविताना त्‍याचे वय शाळेच्‍या नोंदींनुसार 17 वर्षे 6 महिने असल्‍याची माहिती दिली.

उत्तर प्रदेशातील भवानीपूर शाळेमध्ये हा आरोपी आठवीपर्यंत शिकला होता. 'दामिनी'वर सर्वाधिक क्रूर अत्‍याचार आणि जीवघेण्‍या जखमा याच आरोपीने दिल्‍या होत्‍या. परंतु, तो अल्‍पवयीन असल्‍याचे सांगण्‍यात आले. त्‍यामुळे त्‍याच्‍या वयाची खात्री पटविण्‍याचे प्रयत्‍न सुरु आहेत. काल त्‍याच्‍या शाळेच्‍या आजी-माजी मुख्‍याध्‍यापकांचा जबाब नोंदविण्‍यात आला. त्‍यावेळी त्‍यांनी सांगितले की, शाळेत प्रवेश घेताना त्याचे वडील आले होते आ​णि त्यांनी त्याची जन्मतारीख 6 एप्रिल 1995 असल्याचे त्यावेळी सांगिले होते. परंतु, त्‍याच्‍या पालकांकडे जन्‍म दाखला मागितला नव्‍हता. मात्र त्याच्या पालकांकडे जन्मदाखला मागितला नव्हता, असेही त्यांनी स्‍पष्‍ट केले. आता यासंदर्भात याप्रकरणी 28 जानेवारीला पुढील सुनावणी होणार आहे.