Home »National »Delhi» Delhi Gang Rape Victim's Father Tells Her Name To World

दिल्‍ली गँगरेपः पित्याने जगाला सांगितले शूर कन्‍येचे नाव

वृत्तसंस्‍था | Jan 07, 2013, 11:03 AM IST

नवी दिल्‍ली- दिल्‍लीत 16 डिसेंबर रोजी धावत्‍या बसमध्ये घडलेल्‍या सामुहिक बलात्‍कार प्रकरणातील पीडितेचे वडीलही आता जगासमोर आले आहेत. त्‍यांनी त्‍यांच्‍या शूर कन्‍येचे नावही सांगितले. तिचे नाव जाहीर करण्‍यात आपली कोणतीही हरकत नसल्‍याचे ते म्‍हणाले. (www.divyamarathi.com) ने तिचे नाव जाहिर न करण्‍याचा निर्णय घेतला आहे) या शूर कन्‍येचे नाव जगाला कळले पाहिजे, असे ते सांगतात. ते म्‍हणाले, त्‍याच्‍या मुलीने कोणतेही चुकीचे काम केलेल नाही. स्‍वतःचे रक्षण करताना तिचा मृत्‍यू झाला आहे. ती जगातील इतर महिलांसाठी प्रेरणास्‍त्रोत बनू शकते.

'दामिनी'च्‍या वडिलांनी एका ब्रिटीश वर्तमानपत्राला मुलाखत दिली. या मुलाखतीमध्‍ये त्‍यांनी सांगितले की, तिच्‍यासोबत काय घडले हे आम्‍हाला रुग्‍णालयात पोहोचेपर्यंत माहिती नव्‍हते. केवळ दुरध्‍वनीवरुन मुलीला रुग्‍णालयात गंभीर अवस्‍थेत दाखल करण्‍यात आल्‍याचे सांगण्‍यात आले होते. रात्री 11.15 वाजता आम्‍हाला ही माहिती मिळाली. मी थोड्यावेळापूर्वीच कामावरुन परतलो होतो. माझी पत्‍नी मुलीबद्दल चिंतेत होती. बराच वेळ झाला तरीही ती परतली नव्‍हती. दुरध्‍वनीवरून माहिती मिळाल्‍यावर एका मित्रासह मोटरसायकलवरुन मी रुग्‍णालयात पोहोचलो. तेथे ती पलंगावर पडली होती. तिचे डोळे बंद होते. तिच्‍या डोक्‍यावरुन मी हात फिरविला आणि तिला आवाज दिला. तिने डोळे उघडले आणि ओक्‍साबोक्‍शी रडू लागली. मी कसेबसे अश्रू रोखले. पोलिसांनी काही वेळाने घटनेबद्दल सविस्‍तर माहिती दिली. त्‍यानंतर पत्‍नी आणि मुलांनाही रुग्‍णालयात बोलाविले. परंतु, त्‍यांना गँगरेपबद्दल सांगू शकलो नाही, असे 'दामिनी'चे वडील म्‍हणाले.

Next Article

Recommended