आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दिल्ली गँगरेप खटल्याची सुनावणी बंदद्वारात होणार

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली- पॅरामेडिकल विद्यार्थिनीवरील गँगरेप प्रकरणाची सुनावणी जलदगती न्यायालय बंदद्वार करणार आहे. न्यायालयाने सोमवारी हा निर्वाळा दिला. प्रकरणातील सहापैकी पाच आरोपींना बंदोबस्तात न्यायालयात हजर करण्यात आले. सुनावणी कशी होणार, रिपोर्टिंगवर बंदीचे काय, अशी विचारणा विशेष सरकारी वकील डी. कृष्णन यांनी केली. त्यावर महानगर न्यायदंडाधिका-या चा निर्णय लागू राहील, असे अतिरिक्त सत्र न्यायाधीश योगेश खन्ना यांनी स्पष्ट केले. सुनावणी बंदद्वार होईल आणि रिपोर्टिंगवर बंदी राहील, असे महानगर न्यायदंडाधिका-या नी दोन दिवसांपूर्वी म्हटले होते.

पाच कोणत्या आरोपांखाली खटले चालवायचे यावर गुरुवारी चर्चा होणार आहे. सहाव्या आरोपीवर बालन्यायालयात खटला चालणार आहे. दरम्यान, प्रकरणाची सुनावणी दिल्लीबाहेर करण्याची मागणी करणारी आरोपी मुकेश याची याचिका सर्वोच्च न्यायालयाने दाखल करून घेतली आहे. त्यावर मंगळवारी सुनावणी करण्यात येईल, असे सरन्यायाधीश अल्तमस कबीर यांच्या नेतृत्वाखालील पीठाने म्हटले आहे. आरोपीच्या वकिलाने हे प्रकरण मथुरा येथे ट्रान्सफर करण्याची मागणी केली आहे.
------