आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Delhi Gangarape Victim's Brother Will Get Flat And Other Employment:gandhi

दिल्ली बलात्कार पीडिताच्या भावाला द्वारकेत फ्लॅट,तर कुटुंबातील सदस्याला नोकरी : गांधी

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

बलिया - सा-या देशाला हादरवणा-या दिल्लीतील बलात्कार प्रकरणातील पीडिताच्या भावाला द्वारकेत फ्लॅट तर कुटुंबातील सदस्याला नोकरी देण्याचे आश्वासन काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांनी दिले आहे.

गांधी आणि उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी शनिवारी पीडित कुटुंबाची भेट घेऊन त्यांचे सांत्वन करण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी सोनियांनी हे आश्वासन दिल्याचे पीडिताच्या भावाने स्पष्ट केले. आरोपीविरुद्ध आरोपपत्र दाखल झाले आहे. त्याला लवकरच शिक्षा होईल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. सोनिया सुमारे तासभर कुटुंबीयांसोबत होत्या. कायद्याच्या कक्षेत काय करता येऊ शकेल. याचा विचार करून योग्य ती कारवाई केली जाईल. आपण काळजी करू नका. आपल्या कुटुंबातील सदस्य या नात्याने आपण भेट घेण्यासाठी आलो आहोत. या प्रकरणात वैयक्तिक लक्ष घालू, असे त्यांनी सांगितले. पीडिताचे कुटुंब 1983 मध्ये बलियातून दिल्लीत दाखल झाले होते. तरुणीचे बालपण, त्या आठवणी तिचे सायकोथेरपी कोर्सचे शिक्षण आदी गोष्टींवर सोनियांनी कुटुंबीयांशी चर्चा केली.