आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Delhi High Court Blast Prime Accused Killed In Encounter

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

दिल्‍ली उच्‍च न्‍यायालय बॉम्‍बस्‍फोटातील प्रमुख आरोपी चकमकीत ठार

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

जम्‍मू - दिल्ली उच्च न्यायालयाबाहेर झालेल्‍या बॉम्‍बस्‍फोटातील प्रमुख आरोपी आमीर अली याला लष्‍काराच्‍या जवानांसोबत झालेल्‍या चकमकीत ठार मारण्‍यात आले. आमीर हा हिजबुल मुजाहिदीन या दहशतवादी संघटनेचा प्रमुख कमांडर होता. जम्‍मू आणि काश्मिर येथील किश्‍तवाड जिल्‍ह्यात ही चकमक झाली.
दिल्‍ली उच्‍च न्‍यायालयाबाहेर 7 सप्टेंबर 2011 रोजी बॉम्‍बस्‍फोट झाला होता. बॉबस्फोटात 15 जण ठार तर, सुमारे 50 जण जखमी झाले होते. आमीर हा याप्रकरणात प्रमुख आरोपी होता. त्‍याच्‍यासोबत हिजबुलचे आणखी दोन दहशतवादी ठार झाले. किश्‍तवाड जिल्‍ह्यात एका गावात दहशतवादी लपुन बसल्‍याची माहिती मिळाल्‍यानंतर सैन्‍याच्‍या जवानांनी त्‍यांना घेरले. यावेळी मोठी चकमक उडाली. ठार झालेल्‍या इतर दोन दहशतवाद्यांचाही दिल्‍ली बॉम्‍बस्‍फोटात सहभाग होता. त्‍यांच्‍याकडून काही शस्‍त्रेही गोळा करण्‍यात आली आहेत.
राजधानी दिल्‍ली \'लष्‍कर\'च्‍या निशाण्‍यावर, जुंदलला 31 जुलैपर्यंत पोलिस कोठडी
दिल्‍ली उच्‍च न्‍यायालय बॉम्‍बस्‍फोटप्रकरणी आणखी एकाला किश्‍तवाडमधून अटक