आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अत्याचार प्रकरण : सुनावणी दिल्लीबाहेर करा

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली - पॅरामेडिकल विद्यार्थिनीवरील सामूहिक अत्याचार प्रकरणाची सुनावणी दिल्लीबाहेर करण्यात यावी, अशी मागणी या प्रकरणी अटकेत असलेल्या सहापैकी एका आरोपीने केली आहे. यासंदर्भात त्याने सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली असून त्यात ही मागणी करण्यात आली आहे. आरोपी मुकेशचे वकील एम. एल. शर्मा यांनी ही माहिती दिली. त्यांनी सांगितले की, या प्रकरणाचा तपास करणारे पोलिस व न्यायदंडाधिकारी जनतेच्या दबावाखाली येऊ शकतात. त्या दबावाखाली ते आदेश जारी करू शकतात. त्यामुळे निष्पक्ष सुनावणी होणे शक्य नाही. त्यामुळे हा खटला अन्यत्र हलवण्यात यावा, अशी मागणी आरोपीच्या वतीने करण्यात आली आहे. याचिकेवर 21 जानेवारी रोजी फास्ट ट्रॅक कोर्टात सुनावणी होणार आहे. या प्रकरणी सहा आरोपींवर युवतीवर अत्याचार व हत्येचे आरोप आहेत. पीडित युवतीचा 29 डिसेंबर रोजी सिंगापूरच्या न्यायालयात मृत्यू झाला होता.