आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

\'दामिनी\'ला न्याय मिळविण्यासाठी भू-समाधी घेणार नागा साधू!

10 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्‍ली- देशाची राजधानी असलेल्या दिल्लीत सामूहिक बलात्काराला बळी ठरलेल्या 'दामिनी'ला न्याय मिळवा म्हणून अलाहाबाद येथे सुरु असलेल्या महाकुंभ मेळ्यातील एक नागा साधू पुढे आले आहे. 'दामिनी'साठी एक नागा साधू भू-समाधी घेणार आहेत. श्‍यामानंद सरस्‍वती असे या नागा साधूचे नाव आहे. श्यामानंदजी एक फेब्रुवारीला सकाळी सव्वा अकराला भू-समाधी घेणार आहे.

दिल्ली गॅंगरेपच्या घटनेमुळे संपूर्ण देश हादरून गेला आहे. त्याची दखल अलाहाबाद येथे सुरु असलेल्या महाकुंभ मेळ्यात आलेल्या नागा साधुंनीही घेतली आहे. सामूहिक बलात्काराला बळी ठरलेल्या 'दामिनी'ला न्याय मिळवा, तिला गंभीर जखमी करणार्‍या नराधमांना कठोर शिक्षा व्हावी, यासाठी गंगा-यमुनेच्या संगमा जवळ असलेल्या जमिनीवर श्यामानंद सरस्वती हे शुक्रवारी (एक फेब्रुवारीला) भू-समाधी घेणार आहेत. यासाठी जमीन खोदण्याचे कामही सुरु आहे.

देशातील महिलांवर होणार्‍या अत्याचाराचा निषेध करण्‍यासाठी श्यामानंद सरस्वती आठ दिवसांसाठी भू-समाधी घेणार आहेत नऊ फेब्रुवारीला जमिनीबाहेर येणार आहेत.

पुढील छायाचित्रांवर क्लिक करून पाहा... मन सुन्न करणार्‍या देशातील बलात्काराच्या घटना...