आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करानवी दिल्लीः प्राप्तीकराची माहिती देण्यास कॉंग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी नकार दिला होता. परंतु, त्यांची संपत्ती किती, या प्रश्नाचे उत्तर त्यांनी गेल्या लोकसभा निवडणुकीच्या अर्जासोबत जोडलेल्या तपशीलातून मिळाली होती. सोनियांनी १ कोटी ३८ लाख रुपयांची संपत्ती असल्याचे त्यावेळी जाहीर केले होते.
त्याआधी २००८-०९ मध्ये ५ लाख ५८ हजार रुपये प्राप्तीकर आणि ३२ हजार ५१२ रुपये संपत्ती कर भरल्याचे सोनियांनी जाहीर केले होते. हा आयकर पाहता सोनियांचे वार्षिक उत्पन्न १६ ते १७ लाख रुपये असण्याचा अंदाज आहे. परंतु २०१० मध्ये खासदारांचे पगार वाढले. त्यामुळे त्यांचे उत्पन्नही ३७ लाखांवर पोचले आहे. खासदारांचे हे उत्पन्न आयकरमुक्त आहे.
याशिवाय सोनिया या राष्ट्रीय सल्लागार परिषदेच्या अध्यक्षाही आहेत. या परिषदेवर २०११-१२ या वर्षात ३ कोटी ७७ लाख रुपये खर्च करण्यात येणार आहेत. परिषदेच्या सदस्यांनाही घसघशीत मानधन देण्यात येते. सोनियांनी जाहीर केल्याप्रमाणे त्यांच्याकडे ८८ लाख ३३ हजार रुपये रोख आहेत. त्यावर ८.५ टक्के व्याज गृहित धरले तरी सोनियांना ७ लाख ५० हजार रुपये फक्त व्याजाचेच उत्पन्न मिळते, अशी आकडेवारी उपलब्ध झाली आहे.
प्राप्तिकराची माहिती देण्यास सोनिया गांधींचा नकार
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.