आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कुंभमेळ्यात धर्मसंसदेला सुरुवात; पाच हजारांपेक्षा जास्त साधू-संत सहभागी

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

अलाहाबाद- महाकुंभमध्ये आज विश्व हिंदू परिषदेची धर्मसंसद सुरु झाली आहे. यात सुमारे 5 हजार साधू-संत सहभागी झाले आहेत. या भव्य सोहळ्यात हिंदुत्व, राम मंदिर, गो संवर्धन, दहशवाद, बांगलादेशी घुसखोर आणि काही मठ मंदिरांत सरकारने केलेले मालकी घुसखोरी यावर विस्तृत चर्चा होणार आहे. यात पूर्वोत्तर आणि दक्षिण भारत राज्यांतील साधू-संत यांच्याबरोबरच बौद्ध आणि जैन संत सहभागी झाले आहेत.

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत धर्मसंसद पोहचलेले आहेत. आज सकाळी त्यांनी कांची शंकराचार्य स्वामी जयेंद्र सरस्वती यांची भेट घेतली. दुसरीकडे, प्रवीण तोगडिया धर्माच्या आखाड्यात राजकीय अखाडा कसा राहील याची काळजी घेत पुन्हा मुस्लिमांवर हल्ला केला आहे. देशातील हिंदू-ओबीसी बांधवांच्या नौक-या मुस्लिमांना दिल्या जात असल्याचा आरोप त्यांनी केला.

यात काँग्रेसचे वरिष्ठ नेते दिग्विजय सिंग यांनी म्हटले आहे की, श्रीरामाचे मंदिर बांधण्यासाठी कोणाचाही विरोध नाही मग त्यामुळे दुस-यांना त्रास का देता. या मुद्याचे राजकरण करु नये. दुसरीकडे भाजपचा महत्त्वाचा सहकारी पक्ष जेडीयूचे प्रवक्ते शिवानंद तिवारी यांनी म्हटले आहे की, राम मंदिर भाजपचा अजेंडा असू शकतो, एनडीएचा नाही. मोहन भागवत यांनी राम मंदिराबाबत एकत्र येण्याची गरज असल्याचे सांगत हा मुद्या राजकारणाचा नसून हिंदू अस्मिता व भावनेचा असल्याचे म्हटले आहे.