आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

राष्ट्रपती निवडणूकीनंतर वाढणार डिझेलच्या किंमती !

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली - राष्ट्रपती निवडणुकीनंतर देशात डिझेलचे दर वाढण्याची शक्यता आहे. पीटीआय वृत्तसंस्थेने दिलेलल्या वृत्तानुसार लिटर मागे ५ रुपयांनी ही वाढ होण्याची शक्यता आहे.
१९ जूलैला राष्ट्रपती निवडणुकीसाठी मतदान होणार आहे. त्यानंतर केंद्र सरकार डिझेलच्या दरात वाढ करण्याच्या तयारीत आहे. डिझेलची किंमत वाढली तर महागाई मोठ्या प्रमाणात वाढण्याची शक्यता आहे. आधीच अनेक राज्यात मान्सुनने हुलकावणी दिली आहे. त्यात डिझेलचे दर वाढले तर जीवनावश्यक वस्तुंच्या किंमती आकाशाला भिडतील.
विशेष म्हणजे सर्व प्रकारच्या वाहतुकीसाठी डिझेल वाहनांचा मोठ्या प्रमाणात वापर होतो. त्यामुळे सहाजिकच अन्न-धान्यांच्या किंमती वाढतील. यंदा २३ टक्के कमी पाऊस झाला आहे. हा मुद्दा देखील महागाईच्या आगीत तेल ओतण्यासारखा आहे.

भाजीपाल्यात भाव वाढ अटळ !
अपेक्षीत पाऊस न झाल्यामुळे भाजीपाल्याचे भाव आधीच गगनाला भिडले आहेत. त्यात डिझेल ५ रुपये महाग झाल्यास त्याचा परिणाम भाज्यांच्या भाववाढीवर होईल. साधारण ३० टक्के भाववाढ होण्याची शक्यता आहे. त्यामुळे सर्वसामान्यांचे रोजचे जगणे महाग होणार आहे.
करांत नव्हे, डिझेल दरात वाढ करा!
डिझेल कार खरेदी करत असाल तर..
डिझेल कार : छोट्या शहरांतून मोठी मागणी
पेट्रोल 2 रुपये 46 पैशांनी स्वस्त, औरंगाबादेत 73.31 रुपये लिटर
पेट्रोल दरकपातीस तेल कंपन्यांचा नकार