आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करानवी दिल्ली- हिंदू दहशतवादावरुन गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी भारतीय जनता पार्टी आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघावर आरोप केल्यानंतर आता दिग्विजय सिंह यांनीही या वाकयुद्धात उडी घेतली आहे. मुंबईवर झालेल्या दहशतवादी हल्ल्याचा मास्टरमाईंड हाफिज सईदचा सिंह यांनी 'साहेब' असा उल्लेख करतानाच संघाला बॉम्ब बनविण्याचा कारखाना म्हटले आहे.
कॉंग्रेस आणि आरएसएसच्या नेत्यांमध्ये सध्या शाब्दिक जुगलबंदी सुरु आहे. गृहमंत्री शिंदे यांच्या वक्तव्यावर संघाचे प्रवक्ते राम माधव यांनी सडेतोड उत्तर दिले. तर दिग्विजय सिंह आता शिंदेंच्या समर्थनार्थ पुढे आले आहेत. शिंदे जे बोलले ते मी गेल्या 11 वर्षांपासून सांगत आलो आहे, असे दिग्विजय सिंह म्हणाले. एवढेच नव्हे तर हाफिजबद्दल सिंह म्हणाले, हाफिज सईद साहेब दहशतवादी कारवायांमध्ये गुंतलेले आहेत. पाकिस्तानी सरकार त्यांच्यावर कारवाई करीत आहे.
भाजप आणि संघाने या वक्तव्यावरुन शिंदे आणि सिंह यांच्यावर प्रतिहल्ला चढविला आहे. राम माधव यांनी शिंदे यांच्या वक्तव्याला उत्तर देताना सांगितले की, शिंदे हे तर दहशतवाद्यांचे डार्लिंग आहेत. संघटनांनी त्यांचे अभिनंदन केले आहे. शिंदे अशाप्रकारची विधाने करून देशाच्या शत्रूंची मदत करत आहेत. जे खरोखरचे दहशतवादी आहेत त्यांच्यासाठी तर शिंदे डार्लिंगच आहेत, अशी टीका राम माधव यांनी केली.
दुसरीकडे भाजपचे प्रवक्ते शाहनवाज हुसैन यांनी दिग्विजय सिंह यांच्यावर टीका करताना सांगितले की, शहिद हेमराजचे शिर कापून नेणा-या पाकिस्तानींबाबत ते काहीही बोलत नाही. ते देशभक्त संघटनांचा अपमान करतात. ही कॉंग्रेसची मानसिकता आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.