आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Dinosaur Egg Fossils Sold At Mere 500 Ruppes In Madhya Pradesh

फक्त 500 रुपयांमध्‍ये मिळतात डायनॉसॉरची अंडी!

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

जबलपूर- मध्‍य प्रदेशमध्‍ये डायनॉसॉरची लाखो वर्षांपूर्वीची अंडी अगदी कवडीमोल भावाने विकली जात असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. यावर मध्‍य प्रदेश सरकारचा कोणत्‍याही प्रकारचा अंकुश नसल्‍यामुळे सर्रासपणे या अमुल्‍य ठेव्‍याची तस्‍करी होत आहे.

प्राप्‍त माहितीनुसार, मध्य प्रदेशातील धार-मांडला या पट्ट्यात अनेक जीवाश्‍म आढळतात. जीवाश्‍म स्‍वरुपात डायनॉसॉरची अंडी या भागात मोठृया संख्‍येने सापडतात. आंतरराष्ट्रीय बाजारात डायनॉसॉरच्या एका अंड्याची किंमत जवळजवळ एक कोटी रुपये आहे. परंतु, धार-मांडला पट्ट्यात हेच अंडे फक्त 500 रुपयांना मिळते आहे. डायनॉसॉरच्या अंड्यांना जीवाश्म अभ्यासकांकडून मोठी मागणी आहे. या अंड्यांचे महत्त्व आणि पुरातत्वीय मूल्य किती आहे, याची स्‍थानिकांना कल्‍पना नाही. त्‍यामुळे कवडीमोल भावात अंड्यांची सर्रास तस्‍करी होत आहे. ही तस्करी थांबण्यासाठी सरकारकडून अद्याप कोणत्याही प्रकारची पावले उचलली गेली नाही. सरकारने या भागाच्या संरक्षणाच्या दृष्टीने प्रयत्न करणे आवश्‍यक आहे. हे तस्कर मुख्यत: गुजरात आणि राजस्‍थान या भागातील आहेत. येथील आदिवासी जमातींनाही त्यांचा त्रास होत असल्याचे सूत्रांनी सांगितले.